शिक्षकांची वेतन देयके आॅफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 10:35 PM2018-02-04T22:35:34+5:302018-02-04T22:36:19+5:30
शालार्थ वेतन प्रणालीची सेवा बंद असल्यामुळे ती पूर्ववत होईपर्यंत शिक्षकांची वेतन देयके आॅफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात यावी, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शालार्थ वेतन प्रणालीची सेवा बंद असल्यामुळे ती पूर्ववत होईपर्यंत शिक्षकांची वेतन देयके आॅफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात यावी, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती.
शिक्षकांची वेतन देयके आॅफलाइन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाचे परिपत्रक निर्गमित केल्याने शेखर भुयार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शिक्षकांची वेतन देयके ज्या वेतन प्रणाली मधुन काढली जातात त्या शालार्थ वेतन प्रणालीची सेवाच १० जानेवारीपासून बंद असल्यामुळे शिक्षकांना वेतनाची माहिती भरण्यास अडचण येत होती. १० जानेवारीपासून ही वेबसाइट बंद असल्यामुळे शाळांना वेतनाची महितीच भरता आली नाही. शिक्षकांचे सर्व व्यवहार वेतनावरच अवलंबून असून त्यांना कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी शालार्थ वेतन प्रणालीची सेवा तत्काळ सुरु करावी अथवा या शालार्थ वेतन प्रणालीत काही तांत्रिक अडचणी असल्यास ती दुरुस्त होईपर्यंत शिक्षकांची वेतन देयके आॅफलाइन पद्धतीने स्वीकारावी, अशी मागणी भोयर यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली होती. याचा पाठपुरावा शिक्षण उपसचिव चारुशीला चौधरी यांच्याकडेही केला असता हा प्रश्न मार्गी लागल्याचे भोयर यांनी सांगितले.