शिक्षकांच्या समस्या सीईओंच्या दरबारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:42 PM2017-12-31T23:42:55+5:302017-12-31T23:43:48+5:30
जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या सर्व समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी शनिवारी प्रहार शिक्षक संघटनेने मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या सर्व समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी शनिवारी प्रहार शिक्षक संघटनेने मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
प्रहार शिक्षक संघटनेच्या प्रमुख मागण्यामध्ये जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू करून त्याबाबतचे कालबद्ध वेळापत्रक जाहीर करावे, सन २००५ नंतर सेवेत रूजू झालेल्या सर्व शिक्षकांची डीपीसी.एस.कपात सुरू आहे. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेशानुसार, ती सुरू असलेली कपात बंद करण्याऐवजी कार्यवाही करून संबंधित शिक्षकांना हिशेब विवरणपत्रासह देण्यात यावा, अप्रशिक्षित शिक्षण सेवकपदी नियुक्ती दिलेल्या शिक्षकांना शिक्षण सेवकांचा ३ वर्षांचा कालावधी संपल्यानंतर ते डी.एड.पदविका पूर्ण करेपर्यंतच्या कालावधीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अप्रशिक्षित शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करून संबंधित शिक्षकांची थकबाकीची रक्कम देण्यात यावी, दहा विद्यार्थी पटसंख्या असणाºया शाळा बंद बाबतच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेता आपल्या स्तरावरून तूर्तास स्थगिती देण्यात यावी, अशा विविध मागण्या मुख्यकार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेने निवेदनाव्दारे केल्या आहेत.
यावर सीईओंनी योग्य कारवाईचे आश्वासन यावेळी दिले. निवेदन देतेवेळी प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी महेश ठाकरे, सूरज वाघमारे, अमोल वऱ्हेकर, सुरेश माहोरे, अजय गुल्हाने, गौरव खोंडे, संतोष मनोहरे, विष्णू दिघाडे, किशोर रूपनारायण, दिप्ती सहारे, सारिका पाटील, सुचिता रसे आदी उपस्थित होते.