‘त्या’ शिक्षकांचे वेतन आता आॅफलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:53 PM2018-05-25T22:53:19+5:302018-05-25T22:53:31+5:30
शालार्थ क्रमांक मिळविण्यास पात्र असताना वेतन न झालेल्या व आतापर्यंत आॅफलाइन पद्धतीने वेतन झालेल्या अशा सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जुलै २०१८ पर्यंत आॅफलाइन वेतन काढण्याचे निर्देश शिक्षण उपसचिव चारूशीला चौधरी यांनी १८ मे रोजी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शालार्थ क्रमांक मिळविण्यास पात्र असताना वेतन न झालेल्या व आतापर्यंत आॅफलाइन पद्धतीने वेतन झालेल्या अशा सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जुलै २०१८ पर्यंत आॅफलाइन वेतन काढण्याचे निर्देश शिक्षण उपसचिव चारूशीला चौधरी यांनी १८ मे रोजी दिले.
शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण संचालक (पुणे) व शिक्षण उपसचिव यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. भोयर यांनी १८ मे रोजी शिक्षणमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी स्वप्निल कापडनीस यांच्यामार्फत शिक्षणमंत्र्यांकडे या मागणीचा पाठपुरावा केला होता. शालार्थ वेतनप्रणालीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयात कृतिदल स्थापन करण्यात आले. परंतु, या कृती दलाला निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार न देण्यात आल्यामुळे ते निकामी ठरले. हे कृतिदल रद्द करण्यात येऊन शालार्थ वेतन प्रणाली मध्ये अडकलेल्या व वेतनापासून वंचित असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन आॅफलाइन करण्यात यावे, अशी मागणी शेखर भोयर यांनी रेटून धरली.