अंजनगाव सुर्जी येथे सागवान तस्करांना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:18 AM2021-08-25T04:18:01+5:302021-08-25T04:18:01+5:30
चोरट्या मार्गाने रात्रीच्यावेळी सागवान तस्कर खरेदी करताना आढळून येतात. अशीच एक घटना दिनांक २२.८ टेंभुर्णसोंडा वर्तुळात रोजी घडली ...
चोरट्या मार्गाने रात्रीच्यावेळी सागवान तस्कर खरेदी करताना आढळून येतात. अशीच एक घटना दिनांक २२.८ टेंभुर्णसोंडा वर्तुळात रोजी घडली आहे.
चिखलदरा वनविभाग यांना गुप्त माहिती मिळाली की दोन इसम अवैद्य सागवान चौकट घेऊन जात आहेत तेव्हा वनविभाग यांनी नाकेबंदी वनपरिक्षेत्र दहिगाव वर्तुळातील हद्दीतून घनदाट जंगलातून चोरट्या मार्गाने सागवान जाती चे २३ नग किंमत ८० हजार रुपये जंगलामधून सागवान घेऊन कमी भावात अंजनगाव सुर्जी येथे सागवान तस्करना विक्रीसाठी आणत असतांना वनपरिक्षेत्र
अधिकारी एच डी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच्या वेळी
वनरक्षक बि जी महारनर. पवार वनरक्षक.
व्ही बी चव्हाण वनरसक. भैयालाल जामकर वनरक्षक. अशोक राम पऱ्हाड व सुनील राठोड यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये दोन इसमांना अटक करण्यात आली आहे या कारवाईमध्ये २इसमाला ताब्यात घेण्यात आले
आरोपी हिरामण महाजन बेलसरे व तुमाला जावरकर रा.सती पोलीस स्टेशन चिखलदरा आरोपी वर वन गुन्हा क्रमांक दाखल
करण्यात आला असून आरोपींना २५.८.२०२१ पर्यंत न्यायालयात वन कस्टडी सुनावण्यात आली.
हे सागवान चोरटे आदिवासी असून
कमी पैशात वृक्षतोड करून चोरट्या मार्गाने रात्रीच्या वेळी अंजनगाव सुजी ते मोठ्या तस्कराला माल पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे.