अन् महिला बंद्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले !
By admin | Published: August 19, 2016 12:13 AM2016-08-19T00:13:02+5:302016-08-19T00:13:02+5:30
रक्षाबंधन हा सण भाऊ- बहिणींच्या नात्याची विण गुंफणारा सण आहे. या दिवसाची प्रत्येक बहीण आतुरतेने वाट बघते.
कारागृहात रक्षाबंधन : विविध सामाजिक संघटनांचा सहभाग
अमरावती : रक्षाबंधन हा सण भाऊ- बहिणींच्या नात्याची विण गुंफणारा सण आहे. या दिवसाची प्रत्येक बहीण आतुरतेने वाट बघते. हातून कळत नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या ्नरूपात प्रायश्चित करणाऱ्या महिला कैद्यांनादेखील रक्षाबंधनाची ओढ असते. गुन्हेगार ठरल्याने रक्ताची नाती दुरावलेली. परंतु पाषाण भिंतीच्या आतील बंद्यांना राखी बांधताना येथेही रक्षणकर्ता भाऊ आहे, या भावनेने महिला बंद्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांच्या पुढाकाराने गुरूवारी मोठ्या थाटामाटात कारागृहात रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. या अभिनव उपक्रमात शहरातील ९ सेवाभावी संस्थांनी सहभाग घेतला. कारागृहात महिला बंद्यांची संख्या ५० च्या आसपास असून ११०० पुरुष बंदींची संख्या आहेत.