महापालिका टेक्नोसॅव्ही; आता ‘माय अमरावती’ ॲपवर भरा टॅक्स!

By प्रदीप भाकरे | Published: December 7, 2022 04:57 PM2022-12-07T16:57:38+5:302022-12-07T17:02:36+5:30

मालमत्ता करामध्ये भरघोस सुट

Tech-Savvy Municipal corp; Pay tax on 'My Amravati' app! | महापालिका टेक्नोसॅव्ही; आता ‘माय अमरावती’ ॲपवर भरा टॅक्स!

महापालिका टेक्नोसॅव्ही; आता ‘माय अमरावती’ ॲपवर भरा टॅक्स!

Next

अमरावती : अमरावतीकरांना त्यांचा मालमत्ता कर ‘माय अमरावती’ या ॲपवर भरता येणार आहे. सोबतच महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकीकडे मालमत्ता सर्वेक्षण व करनिर्धारणाला वेग आला असताना दुसरीकडे महापालिका प्रशासन टेक्नोसॅव्ही बनले आहे. सोबतच, झोन कार्यालयामध्ये मालमत्ता कर भरण्याची सोय आहेच.

दरम्यान, विहित मुदतीत मालमत्ता कराचा भरणा करणा-या नागरिकांना मालमत्ता करात भरघोस सुट देण्यात आली आहे. सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाकरीता महानगरपालिका क्षेत्रातील संपुर्ण मालमत्तांचे अपेक्षीत मासिक भाडेदरामध्ये ४० टक्के वाढ करुन कराची देयके देण्यात आली होती. त्या दरवाढीस तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. त्यापाश्वभूमिवर नवी कार्यपध्दती निश्चित करण्यात आली असून त्या कार्यपध्दतीनुसार मालमत्ता कराच्या पुनर्गणनेअंती चालु आर्थिक वर्षाची मागणी व थकबाकीच्या एकुण रक्कमेचा ३१ डिसेंबर पुर्वी एकमुस्त भरणा करणा-या मालमत्ता धारकांना शास्तीच्या रक्कमेवर १०० टक्के सुट देण्यात येणार आहे.

तर दोन टक्के सवलत

सन २०२२-२०२३ करीताच्या मालमत्ता कराचा भरणा ३१ डिसेंबरपर्यंत केल्यास मालमत्ता करातील सामान्य कराच्या २ टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने कर भरणा करण्याकरिता नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद प्राप्त व्हावा, यास्तव सन २०२२-२०२३ करीता अन्य सवलती शिवाय अतिरिक्त १ टक्के सवलत देय असणार आहे.

या संधीचा लाभ घेण्याकरीता नागरिकांनी महानगरपालिकेचे झोन कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी केले आहे.

Web Title: Tech-Savvy Municipal corp; Pay tax on 'My Amravati' app!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.