चहाटपरीतून ‘त्यांना’ मिळाले जगण्याचे आत्मभान !

By admin | Published: November 26, 2015 12:18 AM2015-11-26T00:18:02+5:302015-11-26T00:18:02+5:30

घरात अठरा विश्वे दारिद्रय असताना संघर्ष करीत रमेशने लहान भावाला स्वत:च्.ा पायावर उभे केले. त्एका मुलीचे लग्न व दुसरीचे शिक्षण करताना ....

Teesta 'to get' them from self-confidence! | चहाटपरीतून ‘त्यांना’ मिळाले जगण्याचे आत्मभान !

चहाटपरीतून ‘त्यांना’ मिळाले जगण्याचे आत्मभान !

Next

दर्यापूर : घरात अठरा विश्वे दारिद्रय असताना संघर्ष करीत रमेशने लहान भावाला स्वत:च्.ा पायावर उभे केले. त्एका मुलीचे लग्न व दुसरीचे शिक्षण करताना चहा टपरीच्या व्यवसायातून त्यांनी केलेला संघर्ष इतर सुशिक्षीत बेरोजगारांसाठी सुध्दा प्रेरणादायी ठरला आहे. आयुष्यभर रोजंदारी केली. आता स्वत:ची चहाटपरी थाटली. या व्यवसायातून त्यांना आत्मसन्मानाने जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. रमेश स्वत:च्या कुटुंबासाठी संघर्ष करीत आहे. दर्यापूर येथील राजपुतपुऱ्यात राहाणारे रमेश ठाकरे यांनी जीवनाची सुरुवात दर्यापूर येथील बसस्थानकावर असलेल्या कँटीनमध्ये दहा रुपये हप्त्यापासून केली. सतत २० वर्षे एकाच व्यवसायात असताना त्यांना कधी कंटाळा आला नाही. कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविताना त्यांना अनेक अपमानजनक प्रसंग सोसावे लागले. पुढे जाऊन त्यांचे उत्पन्न ७०० रुपये हप्त्यापर्यंत पोहोचले. कुटुंबाची आई-वडिलानंतर जबाबदारी रमेश यांच्या खांद्यावर आली. त्यांनी ती सक्षमपणे सांभाळली. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांनाही त्यांचे कौतुक वाटते. लोकांकडे काम करीत असतानाच ठाकरे कुटुंबीयांनी बसस्थानक चौकात उदरनिर्वाह करण्यासाठी चहा व नाश्त्याचे हॉटेल टाकले. सकाळी साडेतीन वाजता त्यांचा दिवस सुरु होतो. त्यांच्या पत्नी देखील त्यांना सक्षमपणे साथ देतात. सकाळी उठून बसस्टँड चौकातील पिण्याचे पाणी ते आणतात. या व्यवसायात त्यांचा मोठा मुलगा राजूचीही त्यांना मोलाची साथ लाभली आहे. या व्यवसायातून दररोज तीन-चार हजार रुपयांची मिळकत त्यांना होते. त्यातून त्यांना हजार ते दीड हजारापर्यंत नफा मिळत आहे. त्यांच्या कामात सातत्य व प्रामाणिकपणा आहे. याच व्यवसायातून रमेश यांनी मुलगा राजीवला बारावीपर्यंत शिकविले. एका मुलीचा थाटात विवाह केला. तर दुसरी मुलगी शिक्षण घेत आहे. त्यांच्या दोन्ही लहान भावांना त्यांनी रोजगार मिळवून दिला. एका भावाने राममंदिराजवळ तर दुसऱ्या भावाने बसस्थानकाजवळ हॉटेलचा व्यवसाय थाटून प्रगती केली आहे. त्यामुळे हे कुटूंब समाजासाठी आदर्श ठरले आहे. चहाच्या व्यवसायातून त्यांना आत्मसन्मानाने जगण्याची दिशा मिळाली आहे. परिस्थितीच्या नावाने सतत बोटे मोडण्यापेक्षा संघर्षाचा मार्ग चांगला, असे ते सांगतात.

Web Title: Teesta 'to get' them from self-confidence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.