कांडलीत ‘तहसील आपल्या दारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:17 AM2021-09-17T04:17:05+5:302021-09-17T04:17:05+5:30
फोटो - कांडली १६ पी (फोटो कॅप्शन कांडली ग्रामपंचायत मध्ये विविध दाखल्यांसाठी उपस्थित नागरिक) परतवाडा : शासनाच्या विविध योजनांचा ...
फोटो - कांडली १६ पी
(फोटो कॅप्शन कांडली ग्रामपंचायत मध्ये विविध दाखल्यांसाठी उपस्थित नागरिक)
परतवाडा : शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना पोहोचावा, यासाठी शहराला लागून असलेल्या कांडली ग्रामपंचायतीमध्ये ‘तहसील आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत विविध दाखल्यांचे रेशन कार्ड व इतर कामांसाठी नागरिकांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.
अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनात कांडली ग्रामपंचायतमध्ये कांडली येथे पुरवठा विभागामार्फत नवीन शिधापत्रिका तयार करणे, नावे सामाविष्ट करणे व मृतांची नावे कमी करण्याचे काम करण्यात आले. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. सेतु विभागामार्फत विविध दाखले, नैसर्गिक आपत्तीविषयक तक्रारींचा निपटारा करण्यात आला. रोजगार हमी विभाग रोजगारबाबतच्या मागणीसंदर्भात मागणीनुसार अर्ज स्वीकारण्यात आले. या अभियानास कांडली येथी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाला महसूल प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार मंगेश सोळके, तलाठी अमोल बोकडेसह चमू, सरपंच सविता आहाके, उपसरपंच दिलीप धंडारे, व्ही.डी. मोरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील कांडली, अंगणवाडी सेविका व मदतनीस, सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्यध्यापक, तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
140921\264626091738-img-20210914-wa0081.jpg
काडलीत तहसील आपल्या दारी