साडेपाचशे तलाठ्यांचे असहकार आंदोलन, अतिरिक्त कार्यभार सोपविणार तहसीलदारांकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 08:33 PM2017-12-03T20:33:12+5:302017-12-03T20:57:48+5:30
धामनगाव रेल्वे : आपल्या विविध मागणीसाठी जिल्ह्यायातील ५५० तलाठी व ३५ मंडळधिकारी यांनी मागील पंधरा दिवसांपासून असहकार आंदोलन पुकारले आहे.
धामनगाव रेल्वे : आपल्या विविध मागणीसाठी जिल्ह्यायातील ५५० तलाठी व ३५ मंडळधिकारी यांनी मागील पंधरा दिवसांपासून असहकार आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यातील सर्व महसूल कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान सोमवारी आपल्या कार्यालयाच्या चाव्या तालुका प्रशासनाकडे जमा करण्यात येणार आहे.
राज्य शासन केवळ आश्वासन देऊन मागण्या पूर्ण करीत नसल्याने पदाधिकारी व तलाठी संघटनेचे जिल्हा व तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यात शासनाविरोधात असंतोष निर्माण होत आहे. आपल्या मागण्या पूर्ण कराव्या टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले. उपविभाग स्तरावरील पदाधिकारी यांनी प्रथम उपजिल्हाधिकारी याना निवेदन देऊन असहकार आंदोलनाला सुरुवात केली. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात दुस-या टप्प्यात काळ्या फीत लाऊन मंडळ अधिकारी व तलाठयांनी तहसील समोर ठिय्या आंदोलन केले.
सोमवारी तलाठी व मंडळ अधिकारी आपल्याकडे असलेला अतिरिक्त प्रभार तहसीलदार यांचेकडे सोपविणार आहेत. तसेच बुधवार पासून खाजगी लॅपटॉप प्रिंटर वरील कामकाज बंद, करणार असल्याची माहिती तलाठी संघटॅनेचे गोपाल नागरीकर यांनी दिली तर शासनाने तलाठी व मंडळ अधिकारी यांचा अधिक अंत पाहू नये, अशी परखड प्रतिक्रिया मंडळ अधिकारी संघटनेचे एस एस लंगडे यांनी दिली.