चांदूर रेल्वेचे तहसीलदार शेताच्या बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:15 AM2021-08-29T04:15:23+5:302021-08-29T04:15:23+5:30
ई-पीक पाहणी कार्यक्रमात नोंदणी करण्याचे केले आवाहन येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करून ऑनलाईन माहिती भरण्यासंबंधी केले मार्गदर्शन फोटो - चांदूर ...
ई-पीक पाहणी कार्यक्रमात नोंदणी करण्याचे केले आवाहन
येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करून ऑनलाईन माहिती भरण्यासंबंधी केले मार्गदर्शन
फोटो - चांदूर आर २८ ओ
ई-पीक पाहणी कार्यक्रम, तालुक्यातील १२३८ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण
चांदूर रेल्वे : तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी दिल्या. ई-पीक पाहणी कार्यक्रमात नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी व ऑनलाईन माहिती भरण्यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुक्यात २६ ऑगस्टपर्यंत १ हजार २३८ शेतकऱ्यांनी यात नोंदणी केली आहे.
ई-पीक पाहणीचे अनेक फायदे असून, प्रामुख्याने प्रकल्पातील माहिती ही शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभ देण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जसे ठिंबक सिंचन, तुषार सिंचन योजनांचे लाभ खातेदारांना अचूकरीत्या देणे सहज शक्य होणार आहे. याशिवाय खातेनिहाय पीक पाहणीमुळे पीककर्ज अथवा पीकविमा योजना भरणे किंवा पीक नुकसानभरपाई अदा करणे शक्य होणार आहे. यासोबतच या ॲपद्वारे खातेनिहाय व पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होऊ शकणार आहे. तहसीलदार इंगळे यांनी गुरुवारी पळसखेड, सावंगी संगम, राजुरा व बासलापूर शिवारात प्रत्यक्ष भेट दिली. या उपक्रमासाठी गावातील गणेश मंडळे, दुर्गा मंडळे, क्रीडा मंडळाच्या तरुणांनी शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी केले आहे. याबाबत अडचणी आल्यास तलाठी, मंडळ अधिकारी यांना विचारणा करावी, असेही त्यांनी म्हटले. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते.
280821\img-20210828-wa0005.jpg~280821\img-20210828-wa0006.jpg
photo~photo