अकारण फिरणाऱ्यांना तहसीलदारांनी दिली तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:11 AM2021-04-26T04:11:08+5:302021-04-26T04:11:08+5:30
धामणगाव रेल्वे : येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयात कोणतेही काम नाही. मात्र पाण्याची बॉटल घेऊन हौसेपोटी तहसील कार्यालय ...
धामणगाव रेल्वे : येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयात कोणतेही काम नाही. मात्र पाण्याची बॉटल घेऊन हौसेपोटी तहसील कार्यालय परीसरात येऊन बसणाºया अनेकांना शुक्रवारी तहसीलदारांनी तंबी दिली. दरम्यान १ मे पर्यंत आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे निर्देश त्यांनी दिलेत. तब्बल पंधरा रिकामटेकडे तहसील कार्यालय परिसरात आढळले
तालुक्याचे केंद्रबिंदू असलेले तहसील व पंचायत समितीचे कार्यालय एकाच इमारतीत आहे. या कार्यालयात पक्षकारांची दररोज गर्दी असते. कोण कोणत्या कामाला आले याविषयी या दोन्ही कार्यालयात कुणीही विचारपूस करीत नाही. विशेष म्हणजे रिकामटेकड्या माणसाचा या परिसरात अधिक वावर असतो. काहीजण येथे असलेल्या मोकळ्या जागेत आराम करतात. येथील तहसीलदार गौरवकुमार भळगाठीया यांनी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता आणि दुपारी दोन वाजता या कार्यालय परिसरात फिरणाºया अनेक रिकामटेकड्या व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केली. काहींनी आपण सहज आलो, असे सांगितले. आगामी १ मे पर्यंत जर कार्यालय परिसरात दिसले, तर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे तंबी तहसीलदार भळगाठीया यांनी दिली.