तहसीलदार त्याला म्हणाले - तू आमच्या लेखी मयत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 05:00 AM2021-12-10T05:00:00+5:302021-12-10T05:00:58+5:30

धारणी येथील प्रभाग क्रमांक ११ येथील रहिवासी श्याम छोटेलाल मेटकर या ७० वर्षीय हातमजुरी करणाऱ्या वृद्धाने दिलेल्या फिर्यादीनुसार, ते धारणी येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी होते. मात्र, जून-जुलै २०२० पासून त्यांचे निराधार योजनेतील वेतन बंद करण्यात आले. आपल्या खात्यात योजनेची रक्कम का येत नाही, याची विचारणा करण्यासाठी श्याम मेटकर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात गेले असता, त्यांना धक्काच बसला. 

Tehsildar said to him - You are our written death! | तहसीलदार त्याला म्हणाले - तू आमच्या लेखी मयत!

तहसीलदार त्याला म्हणाले - तू आमच्या लेखी मयत!

googlenewsNext

श्यामकांत पाण्डेय
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : ‘साहब, अभी मै जिंदा हू. पता नही क्यू, तहसील वालोने मुझे कागज पर मार डाला’, अशा शब्दांमध्ये धारणी पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या वृद्धाने आर्त हाक दिली व न्याय मिळवून देण्याची मागणी केली. 
धारणी येथील प्रभाग क्रमांक ११ येथील रहिवासी श्याम छोटेलाल मेटकर या ७० वर्षीय हातमजुरी करणाऱ्या वृद्धाने दिलेल्या फिर्यादीनुसार, ते धारणी येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी होते. मात्र, जून-जुलै २०२० पासून त्यांचे निराधार योजनेतील वेतन बंद करण्यात आले. आपल्या खात्यात योजनेची रक्कम का येत नाही, याची विचारणा करण्यासाठी श्याम मेटकर तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात गेले असता, त्यांना धक्काच बसला. 
तहसील कार्यालयाच्या यादीमध्ये श्याम मेटकर यांच्या नावापुढे मृत अशी नोंद आहे. त्यामुळे तुमचे नाव यादीतून वगळण्यात आल्याचे तहसील प्रशासनाकडून त्यांनाच सांगण्यात आले. आपण जिवंत असताना मृत दाखविण्यात आले, हे ऐकताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी थेट आमदार राजकुमार पटेल यांच्याकडे धाव घेतली.
आमदार पटेल यांनी श्याम मेटकर यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांचे सहायक सुरेंद्र देशमुख यांना याप्रकरणी निर्देश देऊन धारणी पोलीस ठाण्यात पाठविले. त्यानुसार मेटकर यांनी आपल्याला जिवंतपणी मारणाऱ्या व सरकारी अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या तहसील कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करून थकीत असलेली संजय गांधी निराधार योजनेची रक्कम मिळवून देण्याचे निवेदन पोलीस ठाण्यात दिले. या प्रकरणामुळे धारणी तहसील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. 
याबाबत प्रभारी तहसीलदारांनी हात झटकले आहेत. विशेष म्हणजे, प्रभारी तहसीलदार अनिल नाडेकर हेच धारणी तहसीलमध्ये संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ते श्याम मेटकर हे मृत असल्याचा अहवाल पाठविणाऱ्या संबंधित तलाठ्याविरुद्द्ध काय कारवाई करतात, याकडे मेटकर यांच्यासह धारणीवासीयांचे लक्ष लागले आहे. 

सध्या माझ्याकडे प्रभारी तहसीलदाराचे काम आहे. श्याम मेटकर याच्या प्रकरणी तलाठी धारणी यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार मृत झाल्याची नोंद करण्यात आली आहे . परंतु आता प्रत्यक्ष व्यक्ती उपस्थित झाल्यामुळे त्याचे प्रकरण पुन्हा सुरू करण्यात येत आहे .
- अनिल नाडेकर, तहसीलदार 

Web Title: Tehsildar said to him - You are our written death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.