जिल्हा पुन्हा गारठला तापमान ६.५ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:40 PM2019-01-08T22:40:21+5:302019-01-08T22:40:45+5:30
दक्षिण चीनच्या समुद्रातील ‘पाबूक’ हे वादळ कमजोर झाल्याने जिल्ह्यासह विदर्भात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढला आहे. परिणामी दोन दिवसांपासून जिल्हा गारठला मंगळवारी पहाटे ६.५ अंश सेंटिगे्रड एवढा पारा घसरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दक्षिण चीनच्या समुद्रातील ‘पाबूक’ हे वादळ कमजोर झाल्याने जिल्ह्यासह विदर्भात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढला आहे. परिणामी दोन दिवसांपासून जिल्हा गारठला मंगळवारी पहाटे ६.५ अंश सेंटिगे्रड एवढा पारा घसरला.
पाबूक वादळ कमजोर झाल्यानंतर त्याचे रूपांतर डिपे्रशनमध्ये झाले. या वादळाने अंदमान पार केल्यानंतर ते आणखी कमजोर झाले. ते ब्रह्मदेशाकडे विरण्याची शक्यता आहे. याचा विदर्भावर परिणाम होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुन्हा उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांनी जोर पकडला आहे. हिमालय, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड येथे जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने विदर्भात थंडीचा जोर वाढला आहे. सोमवारी जिल्ह्यात ६.५ अंश तापमानाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात हुडहुडी भरली. सायंकाळनंतर नागरिकांनी घरी राहणेच पसंत केले आहे.