महेंद्र कॉलनी प्रभागातील सूतिकागृहाच्या इमारतीत तात्पुरते कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:29+5:302021-06-05T04:10:29+5:30
महेंद्र कॉलनी भागातील रुग्णालयाची इमारत ही बंदावस्थेत असल्याने निरुपयोगी ठरत होती . त्यामुळे या इमारतीत १०० खाटांचे सूतिकागृह सुरु ...
महेंद्र कॉलनी भागातील रुग्णालयाची इमारत ही बंदावस्थेत असल्याने निरुपयोगी ठरत होती . त्यामुळे या इमारतीत १०० खाटांचे सूतिकागृह सुरु करण्यासाठी आ. खोडके यांनी पुढाकार घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन आढावा बैठकीत खोडके यांनी हा मुद्दा उपस्थित करून निधीचे नियोजन करण्यासंदर्भात विनंतीपूर्वक मागणी केली. शासनाकडून कोविड उपाययोजनांसाठी मिळालेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपैकी १ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी महेंद्र कॉलनी प्रभागातील मनपा सूतिकागृहाच्या कामांसाठी खर्च करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.
१ कोटी ६१लाख इतका निधी अमरावती महानगर पालिकेला वितरित करण्यात आला. त्यात स्थापत्य कामांकरिता ६९ लक्ष रुपये तर विद्युतीकरणाच्या कामासाठी १५ लक्ष रुपये व मेडिकल साधन सामुग्री उपलब्धीसाठी जवळपास ७७ लक्ष रुपये अशा खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सबब, खोडके यांनी नुकतीत इमारतस्थळी भेट दिली.
यावेळी मनपा उपायुक्त रवी पवार, शहर अभियंता रवींद्र पवार, आरोग्य अधिकारी विशाल काळे, उपअभियंता श्याम टोपरे, शाखा अभियंता शरद तिनखेडे व जयंत काळमेघ, उपअभियंता प्रमोद इंगोले, शासकीय कंत्राटदार जुझर सैफी, यश खोडके, शोएब खान, गाझी जहरोश, सनाभाई, सनाउल्ला, नदीम मुल्ला, अफसर बेग, सय्यद साबीर, आहद अली, साबीर पहेलवान, अक्रम, वाहिद भाई, फारुख मंडपवाले , मोहम्मद शारिक, अतिक नवाब, निसार मन्सुरी, सादिक कुरेशी, हबीब खान ठेकेदार आदी उपस्थित होते.