दहा वानरे शेतात आढळली मृतावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:17 AM2017-12-06T00:17:19+5:302017-12-06T00:17:41+5:30

येथे मंगळवारी सकाळी एका शेतात जवळपास दहा वानरे मृतावस्थेत आढळून आली. त्यांना विषबाधा झाल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे.

The ten apes were found in the field | दहा वानरे शेतात आढळली मृतावस्थेत

दहा वानरे शेतात आढळली मृतावस्थेत

Next
ठळक मुद्देपूर्णानगर येथील घटना : विषबाधा झाल्याचा कयास

आॅनलाईन लोकमत
पूर्णानगर : येथे मंगळवारी सकाळी एका शेतात जवळपास दहा वानरे मृतावस्थेत आढळून आली. त्यांना विषबाधा झाल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे.
पूर्णानगर येथील ग्रामपंचायत सदस्य उमेश महिंगे हे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास शेतात फेरफटक्यासाठी गेले होते. यावेळी प्रल्हादराव नांदणे, विमलताई मांजरे, सुरेश रताळे, शंकर माकोडे यांच्या शेताच्या धुºयाने जवळपास आठ ते दहा माकडे मृतवस्थेत आढळून आली. आणखी काही चिंताजनक असल्याचे यावेळी आढळले. या घटनेची माहिती आसेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. वनविभागाशीही या घटनेसंदर्भात संपर्क करण्यात आला होता. परंतु, त्यांनी घटनेचे गांभीर्य समजून घेतले नाही. पशुवैद्यकीय अधिकाºयांनीही प्रतिसाद दिला नाही. अखेर पुन्हा वनविभागाशी संपर्क साधला असता, दुपारी ३ वाजता वनरक्षक सगणे, विलास पंडित यांनी सहकाºयांसह घटनास्थळी दाखल होऊन मृत वानर व प्रकृती चिंताजनक असलेले वानर अमरावती शहरातील वडाळी येथील वनकार्यालयात पंचनामा व उपचाराकरिता घेऊन गेले. वानरांंना खाद्यान्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी उमेश देवानंद महिंगे, संजय माकोडे, अजय ठाकूर, देवानंद महिंगे, जियाउल्ला सौदागर यांच्यासह पूर्णानगर येथील युवा वर्गाने माकडांना प्रथमोपचार मिळण्याकरिता मोलाचे सहकार्य केले. या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: The ten apes were found in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.