एका लाखाच्या हातपंपासाठी दहा लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 09:35 PM2018-08-27T21:35:49+5:302018-08-27T21:36:12+5:30

पंचायतराजमध्ये थेट ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी केंद्र आणि राज्य शासन देत असले तरी त्याचा उपयोग मनमर्जीप्रमाणे होत असल्याचा प्रकार मेळघाटात उघडकीस येऊ लागला आहे. लाख रुपयांच्या हातपंप संरक्षणासाठी तब्बल दहा लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार तालुक्यातील कोहाना येथे उघडकीस आला आहे

Ten lakhs of rupees for one lakh hands | एका लाखाच्या हातपंपासाठी दहा लाखांचा खर्च

एका लाखाच्या हातपंपासाठी दहा लाखांचा खर्च

Next
ठळक मुद्देशासकीय निधीची ऐसीतैशी : कोहाना गावात हातपंपांना अच्छे दिन

नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : पंचायतराजमध्ये थेट ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी केंद्र आणि राज्य शासन देत असले तरी त्याचा उपयोग मनमर्जीप्रमाणे होत असल्याचा प्रकार मेळघाटात उघडकीस येऊ लागला आहे. लाख रुपयांच्या हातपंप संरक्षणासाठी तब्बल दहा लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार तालुक्यातील कोहाना येथे उघडकीस आला आहे
तालुक्यातील कोहना ग्रामपंचायत अंतर्गत नदीकाठी एक हातपंप आहे. गावकरी तेथून पिण्याचे पाणी भरतात. तूर्तास परतवाडा, धारणी या राज्य महामार्गावर पुलाच्या कडेला असलेल्या या हातपंपाला अच्छे दिन आले आहेत. या हातपंपाच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायतीने ‘१३ वने’ या निधीतून तब्बल दहा लाख रुपयांचा खर्च केला आहे. सौंदर्यीकरणासह संरक्षणावर खर्च केल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. कोहाना येथील आदिवासी गावकरी येथूनच पिण्याचे पाणी भरतात. हा हातपंप नदीकाठी असल्याने तेथे ये-जा करण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे चक्क पेव्हरचा रस्ता हातपंपाला सुरक्षा म्हणून करण्यात आला. त्यामुळे अगदी रस्त्याच्या कडेला असलेला हा सौंदर्यपूर्ण हातपंप चांगलाच चर्चेत आला आहे . एकीकडे आदिवासींचे उत्थान कागदावर असताना हातपंपाच्या सौंदर्यीकरण चुकीचे आहे.
मेळघाटात राहतो की वाळवंटात?
उन्हाळ्यात कोहना गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली. मात्र, २००७ मध्ये येथे १५ लाख रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. उन्हाळ्यात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा स्रोत कमी झाल्याने येथे पाणीटंचाई निर्माण झाली होती. परंतु, लगेच पाच लाख रुपये खर्च करून विहिरीचे खोलीकरण करण्यात आले. पाणीपुरवठ्यासाठी लाखो रुपयांचा खर्च, तर लाख रुपयांच्या हात पंपासाठी दहा लाखांचा खर्च यामुळे कोहाना मेळघाटात की वाळवंटात, असे म्हणायची वेळ आली आहे. मर्जीतले कंत्राटदार लखपती करण्याचा धंदा मेळघाटात सुरू आहे.

ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार हातपंप संरक्षण भिंत, रस्ता व पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येत आहे.
- पी.बी. ठाकरे
उपविभागीय अभियंता, जि.प. बांधकाम विभाग, धारणी

तेरा वने या निधीअंतर्गत दहा लक्ष रुपयांचे हातपंप संरक्षण भिंतीचे काम ई टेंडरद्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतचा ठराव घेण्यात आला आहे
- नरेंद्र काळे, ग्रामसेवक

Web Title: Ten lakhs of rupees for one lakh hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.