ामणगावात दहा दुकाने सील एक लाखाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:13 AM2021-05-22T04:13:08+5:302021-05-22T04:13:08+5:30
धामणगावात दहा दुकाने सील एक लाखाचा दंड धामणगावात दहा दुकाने सील एक लाखाचा दंड नगरपरिषद भरारी पथकाची कारवाई ...
धामणगावात दहा दुकाने सील एक लाखाचा दंड
धामणगावात दहा दुकाने सील
एक लाखाचा दंड
नगरपरिषद भरारी पथकाची कारवाई
धामणगाव रेल्वे
जिल्ह्यात दोन आठवड्याचा कडक लॉक डाऊन असतानाही आपल्या दुकानाच्या शटर उघडे ठेवून मालाची विक्री करणाऱ्या दहा दुकानदाराला तब्बल एक लाखाचा दंड नगर परिषद च्या भरारी पथकाने ठोठावला आहे दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या शंभर अधिक नागरिकावर या भरारी पथकाने कारवाई केली आहे
कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात मागील दोन आठवड्याचा लॉक डाऊन प्रशासनाने घोषित केला होता दरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी धामणगाव शहरात या लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून वेगाने पाउले उचलली या पथकात तब्बल ५० कर्मचारी नियुक्ती करून सकाळी तीन पथके तर सायंकाळी दोन पथके असे या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली दरम्यान सकाळी आपल्या मर्जीनुसार अनेक नागरिक फिरत असल्याचे या पथकाला आढळले एकीकडे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना दुसरीकडे शहरातील काही नागरिक विनाकारण फिरत असल्याचे दिसल्यामुळे नगर परिषद भरारी पथकाने या नागरिकांवर कारवाई केली आहे दरम्यान आपली दुकाने उघडी ठेवणाऱ्या दहा दुकानावर तब्बल एक लाखाचा दंड या भरारी पथकाने ठोठावला आहे या कारवाईत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे किशोर बागवान ,युनूस खान पठाण, शैलेश मेटे हीतेश गावंडे, राजेंद्र भोंगे,विजय कोकाटे उमेश गौडीक, सईद खान पठाण ,रवी हिरुळकर संदीप राऊत ,अशोक यादव, प्रशांत रोकडे ,रवींद्र गुजर सचिन कट्यारमल, मोहन ठाकूर संदीप टिंगणे त्यांनी ही कारवाई केली आहे