बडनेरा येथील रेल्वे वॅगन कारखान्याची निविदा मार्गी

By admin | Published: September 7, 2015 12:21 AM2015-09-07T00:21:50+5:302015-09-07T00:21:50+5:30

बडनेरा येथील प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची निविदा अखेर मार्गी लागली आहे.

Tender for railway wagon factory at Badnera | बडनेरा येथील रेल्वे वॅगन कारखान्याची निविदा मार्गी

बडनेरा येथील रेल्वे वॅगन कारखान्याची निविदा मार्गी

Next

१८७ कोटी रुपये ठरले मूल्य : १५ आॅक्टोबरपर्यंत अवधी
अमरावती : बडनेरा येथील प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याची निविदा अखेर मार्गी लागली आहे. १४ आॅगस्ट रोजी निविदेने पहिला टप्पा गाठला असून १८७ कोटी रुपयांचे निविदा मूल्य ठरविण्यात आले आहे. १५ आॅक्टोबरपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून या यंत्रणेला कार्यादेश दिले जाणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार बडनेरा येथे साकारल्या जाणाऱ्या रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या निर्मितीची जबाबदारी पाटणा येथील रेल्वे बांधकाम विभागावर सोपविली आहे. ई-निविदा प्रक्रिया राबविण्यापासून ते कंत्राटदार नेमून हा प्रकल्प पूर्र्णत्वास नेण्यासह विविध बाबी पाटणा रेल्वे बांधकाम विभागाला पूर्ण कराव्या लागणार आहेत. तीन महिन्यांपासून याबाबत तयारी केली असताना १४ आॅगस्ट रोजी निविदा मार्गी लावल्यावर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

जमीन अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण
अमरावती : दरम्यान हा प्रकल्प साकारल्या जाणार अथवा नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आता ई- निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे बडनेऱ्यात प्रस्तावित रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या निर्मितीचे मार्ग सुकर झाले आहे. या कारखान्याच्या निर्मितीसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्णत्वास गेली आहे. १५ कोटी रुपये जमीन अधिग्रहणाचे वाटप करण्यात आले आहे. या प्रकल्पाशेजारी प्रशस्त इमारत, २०० क्वॉटर्स तर कारखान्याचे शेड उभारले जाणार आहे.

१९६ एकर जमिनीवर साकारणार प्रकल्प
बडनेरा येथे पाचबंगला परिसरातील उत्तमसरा मार्गावर रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या२२ १९६ एकर जमिनीवर साकारला जाणार आहे. त्याकरिता ६४ शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. एकूण २०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून मौजा टाकळी, बडनेरा, दुर्गापूर येथील प्रकलपग्रस्तांच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. २३ घरे तर १०९ लोकसंख्या यामध्ये बाधित होणार आहे.

Web Title: Tender for railway wagon factory at Badnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.