सावरखेड बंधारा दुरुस्तीची निविदा मार्गी

By Admin | Published: August 10, 2016 11:54 PM2016-08-10T23:54:45+5:302016-08-10T23:54:45+5:30

पेढी नदीवरच्या सावरखेड येथील पूल वजा बधाऱ्यांच्या दुरुस्तीची निविदा मार्गी लागली आहे.

Tender roll for repair of Sawarkhed bund | सावरखेड बंधारा दुरुस्तीची निविदा मार्गी

सावरखेड बंधारा दुरुस्तीची निविदा मार्गी

googlenewsNext

एक महिन्याचा अवधी : वेअरींग कोटसह गार्ड स्टोनही लागणार
अमरावती : पेढी नदीवरच्या सावरखेड येथील पूल वजा बधाऱ्यांच्या दुरुस्तीची निविदा मार्गी लागली आहे. दुरुस्तीचे अंदाजपत्रक लघू पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यालयात मंजूरीसाठी सादर करण्यात आले आहे. आठ दिवसात प्रत्यक्ष सुरुवात होऊन एका महिन्याच्या अवधीत हे काम पूर्ण होणार आहे.
वलगाव येथून ४ किमी अंतरावरील सावरखेड येथील पेढी नदीवरच्या पूल वजा बंधाऱ्याच्या चौथ्या कमानीचा दगडी पिल्लर पुर्णत: क्षतिग्रस्त झाल्याने कोठल्याही क्षणी कोसळून महाडची पुनरावृत्ती होऊ शकते. या विषयीची वृत्तमालीका ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडली. याची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत पुलाची पाहणी व दुरुस्ती करण्याचे निर्देश लघुपाटबंधारे विभागाला दिले. यापूर्वी या पुलाच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक महात्मा फुले अभियान अंतर्गत करण्यात आले. मात्र सावरखेड हे गाव बुडीत क्षेत्रात असल्याचा जावईशोध लावत शासनाने या अंदाजपत्रकाला मान्यता दिली नाही. मात्र पेढी नदीला पूर आल्यास येथे कोठल्याही क्षणी जिवितहानी होऊ शकते. या लोकमतच्या वृत्तानंतर मात्र जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले व या कामाचे अंदाजपत्रक पुन्हा तयार करण्यात आले आहे.
खुद्द जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असल्याने आता मात्र बुडील क्षेत्राचा बागुलबुवा करता येणार नाही. महिन्याभऱ्याच्या अवधीत या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तोवर या पुलावरुन २ टनाच्या वरील वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र हा मार्ग शेती वहिवाटीचा असल्याने २ टन वजनाचा टॅक्टरची वाहतूक कोण रोखणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

ओझरखेडच्या पुढच्या मार्गाचे काय ?
सावरखेड बंधाऱ्याची दुरुस्ती होईस्तोवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून ओझरखेड हा पर्यायी मार्ग यंत्रणांनी सुचविला. प्रत्यक्षात सावरखेड ते ओझरखेड पर्यत रस्ता आहे. मात्र पुढे नाही हा रस्ता ‘एमआरईजीएस’ मधून करण्यात येणार आहे. या रस्त्यात शेतकऱ्यांच्या दानपत्राची अडचण आहे. तोपर्यत अडीच हजार नागरिकांनी कोणत्या मार्गाने जावे, हा प्रश्न कायम आहे. भातकुली तहसीलने हा मार्ग मोकळा करण्याची गरज आहे.

अशी होणार बंधाऱ्याची दुरुस्ती
सावरखेड पूल वजा बंधाऱ्याचा चवथा पिल्लर क्षतीग्रस्त आहे यासह अन्य कामाच्या दुरुस्तीसाठी ३ लाखांचे अंदाजपत्रक तातडीने करण्यात आले आहे. यामध्ये पुलाच्या स्लॅबची दुरुस्ती (वेअरिंग कोट) सुरक्षा दगड (गार्ड स्टोन) यांची कामे करण्यात येणार आहे. ३ लाखाचे काम असल्याने ई-निविदा आदी भानगडी नाही. येत्या आठवडयात काम सुरु होणार आहे.

बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी सर्कल आॅफीसमध्ये पाठविण्यात आले आहे. येत्या आठवड्यात कामाला सुुरूवात होईल व महिन्याभऱ्याच्या आत काम पूर्ण होईल.
- सुनील झाडे, उपअभियंता, लघुसिंचन, जलसंधारण विभाग

Web Title: Tender roll for repair of Sawarkhed bund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.