कांडली ग्रामपंचायतमध्ये विकासकामांच्या निविदा जाळल्या, ग्रामपंचायत सदस्याचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 09:04 PM2019-12-26T21:04:21+5:302019-12-26T21:04:41+5:30

सामान्य निधी व चौदाव्या वित्त आयोग निधीतून कांडली ग्रामपंचायतने  सुमारे ४७ लाखांची १६ विकासकामे  प्रस्तावित केली.

Tenders of development works burned in Kandali Gram Panchayat, Gram Panchayat Member's Pratap | कांडली ग्रामपंचायतमध्ये विकासकामांच्या निविदा जाळल्या, ग्रामपंचायत सदस्याचा प्रताप

कांडली ग्रामपंचायतमध्ये विकासकामांच्या निविदा जाळल्या, ग्रामपंचायत सदस्याचा प्रताप

googlenewsNext

परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील कांडली येथे विविध विकासकामांच्या निविदा उघडण्यापूर्वीच ग्रामपंचायत सदस्याने ग्रामपंचायतीच्या आवारातच त्या जाळल्याची घटना घडली. जाळण्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्याने त्या फाडल्या आणि या संपूर्ण कृतीचा व्हिडीओ माध्यमावर व्हायरल केला. २६ डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. 

सामान्य निधी व चौदाव्या वित्त आयोग निधीतून कांडली ग्रामपंचायतने  सुमारे ४७ लाखांची १६ विकासकामे  प्रस्तावित केली. २८ नोव्हेंबरच्या सभेत त्या कामांवर शिक्कामोर्तब करून अचलपूर पंचायत समितीकडून वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यास मान्यता घेण्यात आली. जाहिरातीच्या अनुषंगाने निविदा ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त झाल्या. 

निविदांवर २६ डिसेंबरला ग्रामसेवकांसह ग्रामपंचायतचे कर्मचारी आवक, जावक क्रमांक टाकण्याचे काम करीत होते. यादरम्यान एक ग्रामपंचायत सदस्य कार्यालयात दाखल झाले. त्यांनी टेबलवरील या निविदा उचलून बाहेर नेल्या आणि फाडून जाळून टाकल्या. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर परिसरात घडली.

ज्या निविदा फाडून जाळल्या गेल्यात, त्यावर २७ डिसेंबरला आयोजित ग्रामपंचायतच्या मासिक सभेत निर्णय होणार होता. निविदा फाडून जाळण्याच्या घटनेवर अनेक सदस्यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या घटनेमुळे २७ डिसेंबरला आयोजित सभेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. 

कांडली ग्रामपंचायतमध्ये घडलेल्या प्रकाराची माहिती नाही. कुणीही याबाबत कळविलेले नाही.
- जयंत बाबरे, गटविकास अधिकारी, अचलपूर

घडलेला प्रकार संतापजनक आहे. विकासकामांबाबत, निविदांबाबत ही अशी दुर्भाग्यपूर्ण भूमिका घेतली जात असेल, तर सरपंच म्हणून काम करायचे की नाही, याबाबत विचार करावा लागेल. 
- सुषमा थोरात, सरपंच, कांडली

Web Title: Tenders of development works burned in Kandali Gram Panchayat, Gram Panchayat Member's Pratap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.