दहावीचे विद्यार्थी मुक्त, पाचवीचे मात्र तणावात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:13 AM2021-05-20T04:13:40+5:302021-05-20T04:13:40+5:30
अमरावती : इयत्ता दहावीचे विद्यार्थी परीक्षा रद्द झाल्याने टेन्शनमुक्त झाले आहे. त्यामुळे मुक्तपणे बागडत आहे. परंतु इयत्ता पाचवीचे ...
अमरावती : इयत्ता दहावीचे विद्यार्थी परीक्षा रद्द झाल्याने टेन्शनमुक्त झाले आहे. त्यामुळे मुक्तपणे बागडत आहे. परंतु इयत्ता पाचवीचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वाढत्या तापमानातदेखील ताणतणावात अभ्यास करीत आहेत. परीक्षा कधी होणार? की, होणारच नाही, हे ठामपणे सांगता येत नाही, अशी आजची स्थिती आहे.
शिष्यवृत्तीबरोबर चौथीची प्रज्ञाशोध, नवोदय व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा प्रलंबित आहेत. खरे तर प्रत्येक वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रज्ञाशोध, शिष्यवृत्ती, नवोदय या परीक्षा व्हायच्या व विद्यार्थी एप्रिल, मे महिन्याच्या उन्हाळी सुटीचा मनसोक्त आनंद घ्यायये. पण, कोरोनाने जसे अनेक क्षेत्राला व्यापले यात शैक्षणिक क्षेत्रही अपवाद ठरले नाही. अन्य क्षेत्रात झालेले आर्थिक नुकसान कदाचित भरून निघू शकेल. पण शिक्षणक्षेत्रात विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून निघणे कठीण आहे. मे महिन्या उत्तरार्धात तरी देखील आठवीपर्यंतच्या स्पर्धा परीक्षा यांचे भवितव्य अधांतरी आहे. पहिल्या कोरोना लाटीनंतर शाळा डिसेंबर-जानेवारीत सुरू झाल्या. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झालेला नसेल तर परीक्षा कशा घ्यायच्या? या भूमिकेने शिष्यवृत्ती परीक्षा २५ एप्रिल रोजी जाहीर झाल्या. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव प्रचंड वाढल्याने ही परीक्षा २३ मे रोजी जाहीर झाली. मात्र, अजून कोरोनाचा कहर वाढताच अल्याने पुन्हा ही तारीख रद्द केली गेली. पुढील तारीख यथावकाश कळविली जाईल, असे नव्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे या परीक्षार्थी व मार्गदर्शकांमध्ये संभ्रम व गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
बॉक्स
परीक्षेची अनिश्चितता
वाढत्या उष्णतामानाचा विचार करता शाळा एक मार्चपासून सकाळी भरविण्याची परंपरा आहे. परंतु, आता मे महिना ४० तापमानाची पातळी असतानाही विद्यार्थी मात्र मेटाकुटीला येऊन अभ्यास करताना दिसत आहे. मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिकादेखील फोन किंवा ऑनलाईन पद्धतीने या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवून आहेत. कोरोनाच्या आजच्या भीषण स्थितीत या स्पर्धा परीक्षा कशा होतील, याबद्दल ठाम कोणी सांगू शकत नाही.