उद्यापासून दहावीची परीक्षा, अमरावती विभागात १ लाख ८३ हजार विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 04:59 PM2018-02-28T16:59:14+5:302018-02-28T18:40:24+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा गुरूवार १ मार्चपासून होत आहे. पहिला पेपर सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत राहील. यंदा विभागातील १ लाख ८३ हजार ६९७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्यासाठी ४७७ परीक्षा केंद्र राहणार आहेत. परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा गुरूवार १ मार्चपासून होत आहे. पहिला पेपर सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत राहील. यंदा विभागातील १ लाख ८३ हजार ६९७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्यासाठी ४७७ परीक्षा केंद्र राहणार आहेत. परीक्षेसाठी विभागीय शिक्षण मंडळाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.
विभागातील पाच जिल्ह्यांत इयत्ता दहावीची परीक्षा देणा-यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ४५ हजार ९६९, अकोला ३० हजार ६५८, बुलडाणा ४१ हजार ९४५, यवतमाळ ४३ हजार ४०७, वाशिम २१ हजार ७१८ असे एकून १ लाख ८३ हजार ६९७ परीक्षार्थी आहेत. यासाठी विभागात ६९९ परीक्षा केंद्र राहणार आहेत. यात अमरावती १९३, अकोला ११९, बुलडाणा १५४, यवतमाळ १५२, वाशिम ८१ याप्रमाणे केंद्र राहतील. या परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी ८ भरारी पथके गठित करण्यात आले आहेत.
परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी
परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी आहे. यासह केंद्रावरील सर्व पर्यवेक्षकांनाही मोबाईल बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी आपले मोबाईल केंद्र संचालक यांच्याकडे जमा करायचे आहेत, गरज पडल्यास केंद्र संचालकांना संपक साधाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी सूचना
विद्यार्थ्यांना सूचना परीक्षार्थी पेपरच्या वेळेपूर्वी अर्धातास अगोदर परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे, दुपारीही पेपर असल्यास अर्धा तास अगोदर यावे, असे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे.