दहावी, बारावी परीक्षा कर्तव्यावरील शिक्षक, कर्मचाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:14 AM2021-04-02T04:14:05+5:302021-04-02T04:14:05+5:30

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची २९ एप्रिल आणि बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिलपासून ...

Tenth, twelfth examination Teachers on duty, staff will be corona test | दहावी, बारावी परीक्षा कर्तव्यावरील शिक्षक, कर्मचाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

दहावी, बारावी परीक्षा कर्तव्यावरील शिक्षक, कर्मचाऱ्यांची होणार कोरोना चाचणी

Next

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीची २९ एप्रिल आणि बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिलपासून होणार आहे. त्याअनुषंगाने बोर्डाने परीक्षांची तयारी चालविली असून, परीक्षा केंद्रांवर कर्तव्यावर असलेले शिक्षक, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी होणार आहे. दहावीसाठी २५११ तर, बारावीसाठी १५१९ परीक्षा केंद्र असणार आहे.

विभागीय शिक्षण मंडळाने अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यात दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. शिक्षण मंडळाने कोविड -१९ च्या अनुषंगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे परीक्षा केंद्रांवर पालन होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यंदा दहावीत १,६४, ६३२ तर, बारावी परीक्षेसाठी १,३७, ५६९ विद्यार्थी परीक्षेच्या सामोरे जाणार आहे.

बारावीच्या परीक्षांसाठी विभागातून परीरक्षक केंद, परीक्षा केंद्र. उपकेंद्र, परीक्षक, नियामक, वरिष्ठ नियामक आणि ईतर कर्मचारी असे १८ हजार ३६७ मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. यात अमरावती विभागात केंद्र संचालक ४९८, उपकेंद्र संचालक ४९८, पर्यवेक्षक ६१६२, रिलिव्हर पर्यवेक्षक ९९६, स्टेशनरी पर्यवेक्षक ४९८, लिपिक ४९८, शिपाई ९९६, पाणी वाला १४९४ अन्य घटक ४९८, मुख्य नियामक १०, वरिष्ठ नियामक ६, नियामक ७९७, परीक्षक ४४६०, परीरक्षक ७३, उपपरिरक्षक ७३, सहायक परिरक्षक ४९८, लिपिक ७३, शिपाई १४६ अन्य घटक ७३ असे मनुष्यबळ बारावीच्या परीक्षांसाठी नेमण्यात येणार आहे. अकोला २६८, अमरावती ३९५, बुलडाणा ३१७, यवतमाळ ३४८, वाशिम १९१ असे जिल्हानिहाय परीक्षा केंद्र असणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी अकोला ४३९, अमरावती ६६५, बुुलडाणा ५०३,यवतमाळ ६०९, वाशिम २९५ असे जिल्हानिहाय परीक्षा केंद्र असणार आहे.

----------------------

बारावीच्या परीक्षा केंद्रावर असे राहिल मनुष्यबळ

अकोला- २०९३

अमरावती -३१२५

बुलडाणा- २६४१

यवतमाळ - २७२४

वाशिम - १५७५

--------------------

राज्य शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षांचे नियोजन सुरू झाले आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या कोरोना चाचणीबाबत अद्याप काही गाईडला्ईन नाही. मात्र, जवळपास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली आहे. बोर्डात कर्मचाऱ्यांनी ९० टक्के चाचणी, लसीकरण आटोपले आहे.

- जयश्री राऊत,सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ

Web Title: Tenth, twelfth examination Teachers on duty, staff will be corona test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.