दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:12 AM2021-04-13T04:12:19+5:302021-04-13T04:12:19+5:30
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी, बारावाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी, बारावाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण खात्याने हा निर्णय घेतला. परिणामी अमरावती विभागात दहावीचे १,६४, ६३२ तर, बारावीच्या १,३७,५६९ विद्यार्थ्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे.
विभागीय शिक्षण मंडळाने अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यांत दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन चालविले होते. दहावीसाठी २,५११ तर, बारावीसाठी १,५१९ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. तसेच दहावीचे १,६४,६३२ तर, बारावी परीक्षेसाठी १,३७,५६९ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार होते. मात्र, आता परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी काही काळ परीक्षेतून टेन्शनमुक्त झाले आहेत.
--------------------
बारावीच्या परीक्षेसाठी असे होते केंद्र
अकोला- २६८
अमरावती- ३९५
बुलडाणा- ३१७
यवतमाळ- ३४८
वाशिम- १९१
--------------------
दहावीच्या परीक्षेसाठी प्रस्तावित केंद्र
अकोला ४३९
अमरावती ६६५
बुुलडाणा ५०३
यवतमाळ ६०९
वाशिम २९५
———————————
बारावीच्या परीक्षा केंद्रावर असे राहिल मनुष्यबळ
अकोला- २०९३
अमरावती -३१२५
बुलडाणा- २६४१
यवतमाळ - २७२४
वाशिम - १५७५
——————————
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निर्णयानुसार दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. पुढील आदेशानुसार परीक्षांचे नियोजन करण्यात येईल. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षा पोस्टपोनबाबत कळविण्यात येईल.
- जयश्री राऊत,सहसचिव, विभागीय शिक्षण मंडळ