भीषण अपघात! कार नाल्यात कोसळून सहा ठार, एक गंभीर; रस्त्यावरील सीट कव्हरवरून उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 06:04 AM2022-07-19T06:04:31+5:302022-07-19T06:04:56+5:30

पाऊस असल्याने मजुरांना घरी सोडायला निघालेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले.

terrible accident six dead one seriously after car crashes into drain | भीषण अपघात! कार नाल्यात कोसळून सहा ठार, एक गंभीर; रस्त्यावरील सीट कव्हरवरून उलगडा

भीषण अपघात! कार नाल्यात कोसळून सहा ठार, एक गंभीर; रस्त्यावरील सीट कव्हरवरून उलगडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

परतवाडा (जि. अमरावती) : पाऊस असल्याने मजुरांना घरी सोडायला निघालेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले. परतवाडा ते बैतुल मार्गावरील निंभोरा फाटा येथे रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. 

मात्र, रस्त्यावर पडलेल्या सीट कव्हर वरून पोलिसांना शंका आल्याने या अपघाताचा उलगडा झाला. त्यांनी अपघातग्रस्तांना तत्काळ वाहनातून काढून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एका गंभीर जखमीला अमरावतीला हलविण्यात आले आहे. 

पांडुरंग रघुनाथ शनवारे (३०, चांदूर बाजार), सतीश सुखदेव शनवारे (३०, बहिरम कारंजा), सुरेश विठ्ठल निर्मळे (२५, खरपी), चारचाकींचा चालक रमेश धुर्वे (३०,  सालेपूर) तसेच दुचाकीस्वार प्रतीक दिनेश मांडवकर (२६), अक्षय सुभाष देशकर (२६, चांदूर बाजार) अशी मृतांची नावे आहेत. संजय गजानन गायन (२२, बोदड) हा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास पोलिसांची चमू नियमित गस्तीवर होती. त्यांना सीट कव्हर रस्त्यावर फाटलेल्या अवस्थेत दिसले. शंका येऊन पोलिसांनी पाहणी केली असता, दुचाकी व कार नाल्यात अपघातग्रस्त अवस्थेत निदर्शनास आली. 
बहिरम मार्गावर एक हार्डवेअर प्रतिष्ठान आहे. येथून चालकासह पाचजण चारचाकीने निघाले. निंभोरा फाट्याजवळ पोहोचताच त्यांच्या चारचाकीने  दुचाकीला धडक दिली. यामुळे चारचाकी अनियंत्रित होऊन पुलावरून नाल्यात कोसळली.

Web Title: terrible accident six dead one seriously after car crashes into drain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात