मेळघाटात वाघीणची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:34 AM2019-08-31T01:34:57+5:302019-08-31T01:35:13+5:30
या वाघीणीला बंदिस्त करून मेळघाट बाहेर सोडण्यात यावे अशी मागणी प्रकर्षाने समोर आली आहे. मेळघाटसाठी वाघ किंवा अन्य वन्य प्राण्यांचे हल्ले नवे नाहीत. मात्र दीड महिन्याच्या कालावधीत ई-१ वाघीणीने धुमाकुळ घातल्याने वनविभाग व आदीवासींमध्ये संघर्ष पेटू लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाटातील धारणी तालुक्यात सद्या ‘ई’ वाघीणीने दहशत माजविली आहे. या वाघीनीने दिड महिन्याच्या कालावधीत शेळ्या, गायी, बैल, म्हैस फस्त केली आहे. महिला व मुलीवर हल्ला चढविला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी जंगलातून ही नरभक्षी वाघीण तालुक्यातील डोलार जंगलात सोडण्यात आली. तेव्हापासून आसपासच्या तीस गावांमध्ये ही वाघीण धुमाकूळ घालत आहे. या वाघीणीने मानव प्राण्यांसह पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याने आदिवासी भयभित झाले आहेत.
या वाघीणीला बंदिस्त करून मेळघाट बाहेर सोडण्यात यावे अशी मागणी प्रकर्षाने समोर आली आहे. मेळघाटसाठी वाघ किंवा अन्य वन्य प्राण्यांचे हल्ले नवे नाहीत. मात्र दीड महिन्याच्या कालावधीत ई-१ वाघीणीने धुमाकुळ घातल्याने वनविभाग व आदीवासींमध्ये संघर्ष पेटू लागला आहे. आधीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या पुनर्वसनावरून आदिवासी व वनविभागामध्ये तेढ झाली असतांना ई-१ वाघीणीच्या वाढत्या धुमाकुळाने आदिवासींमध्ये असंतोष वाढीस लागला आहे.
३ जुलै रोजी केकदाखेडा येथील सात वर्षीय मुलीवर या वाघीणीने हल्ला केला. ६ जुलै रोजी कावडाझरी येथे एक म्हैस ठार करूण रखवालदारावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. १२ जुलै रोजी तंबोली येथील महिलेवर हल्ला करून दिला गंभिर जखमी केले. १९ जुलै रोजी तीन शेळ्या फस्त केल्या. २३ आॅगस्ट रोजी धोदरा गावात ४ शेळ्या फस्त केल्या तर तीन जखमी केल्या. २६ आॅगस्ट रोजी बीबामल गावाच्या परिसरात दोन गायीसह दोन वासरे फस्त केली तथा तीन बैलांना जखमी केले. सदर वाघीण बिबामल गावाच्या आसपास असून ती केव्हाही मानवावर हल्ला करण्याची भिती आहे. त्यामुळे त्या वाघीणीचा बंदोबस्त करावा तिला मेळघाट वन्यक्षेत्राबाहेर सोडण्यात यावे अशी मागणी आदीवासी बांधवांनी केली आहे. यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.