दोन महिन्यात १ लाख ५३ हजार ७६ नमुन्यांची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:15 AM2021-04-30T04:15:45+5:302021-04-30T04:15:45+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू प्रयाेगशाळेत मार्च, एप्रिल या दोन महिन्यात १ लाख ५३ हजार ७६ नमुन्यांची ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू प्रयाेगशाळेत मार्च, एप्रिल या दोन महिन्यात १ लाख ५३ हजार ७६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून, सुमारे १६ हजार ६६२ संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नमुने चाचणीला वेग आला आहे. तसेच संक्रमित रुग्णांतदेखील कमालीची वाढ झाली आहे.
विद्यापीठाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेत ४ मे २०२० पासून कोविड १९ नमुने चाचणीला प्रारंभ झाला. आतापर्यंत दोन लाखांच्यावर विद्यापीठाच्या प्रयाेगशाळेत नमुने चाचणी करून अहवाल पाठविण्यात आले आहे. मात्र, २० फेब्रुवारी ते २७ एप्रिल २०२१ या ६६ दिवसांच्या कालावधीत १ लाख ५३ हजार ७६ नमुन्यांची चाचणी करून १६ हजार ६२२ रूग्ण संक्रमित असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे सादर केला आहे. विद्यापीठ प्रयोगशाळेत नोडल अधिकारी, तांत्रिकी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी पॅथॉलॉजिस्ट, विश्र्लेषक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर असे एकूण ४१ अधिकारी, कर्मचारी नमुन्यांची चाचणी करण्यासाठी दिवसरात्र काम करीत आहेत. २७ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १३ हजार २८२ नमुने तपासणी करण्यात आले असून, त्यापैकी दोन लाखांच्यावर अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेत नमुने चाचणी करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी प्रशांत ठाकरे, तांत्रिकी अधिकारी नीरज घनवटे, प्रशासकीय अधिकारी पी,एन. गावंडे, पॅथालॉजिस्ट मुकेश बारंगे आदी कार्यरत आहेत.
------------
अशी केली नमुन्यांची चाचणी
२० ते २८ फेब्रुवारी : ९५३६
१ ते ३१ मार्च : ५०३९७
१ ते २७ एप्रिल : ४५४४३
--------------------
६६ दिवसात असे आढळले संक्रमित रूग्ण
२० ते २८ फेब्रुवारी :३३८७
१ ते ३१ मार्च : ५८६४
१ ते २७ एप्रिल : ७३७१
---------------
कोट
गत दोन महिन्यांपासून दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा वाढला आहे. पॉझिटिव्ह रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. आतापर्यंत विद्यापीठ प्रयोगशाळेने दोन लाख नमुने चाचणी केली असली तरी मार्च, एप्रिल या दोन महिन्यात एक लाख नमुने चाचणी करण्यात आली आहे.
- प्रशांत ठाकरे, नोडल अधिकारी, विद्यापीठ विषाणू चाचणी प्रयोगशाळा