ऑक्सिजन जनरेशन प्लांटसाठी चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:11 AM2021-04-19T04:11:42+5:302021-04-19T04:11:42+5:30
अमरावती : जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा अबाधित रहावा व वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही ऑक्सिजनसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध राहण्याकरिता पाच रुग्णालयांंतील ठिकाणांची ...
अमरावती : जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा अबाधित रहावा व वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही ऑक्सिजनसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध राहण्याकरिता पाच रुग्णालयांंतील ठिकाणांची तपासणी जिल्हा शल्यचिकित्सक करणार आहेत. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिले आहेत.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढता आहे. अनेक रुग्ण आयसीयूमध्ये व आयसीयूच्या बाहेर ऑक्सिजन बेडवर आहेत. जिल्ह्यात तातडीच्या प्रसंगी या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा अबाधित राहावा, याकरिता. १५० ते २०० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स खरेदी करण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. याचसोबत एसडीआरएफच्या निधीतून जिल्ह्यात पीएसए ऑक्सिजन जनरेशन सयंत्र बसविण्यासाठी तत्त्वत: मान्यतादेखील दिलेली आहे. त्यामुळेच आता जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, अचलपूर व धारणी उपजिल्हा रुग्णालय तसेच नांदगाव खंडेश्वर येथील ट्रामा केअर सेंटरमधील जागांची पाहणी करण्यात येणार आहे.