दहा ऑक्टाेबरला होणार टीईटीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:13 AM2021-08-01T04:13:15+5:302021-08-01T04:13:15+5:30
अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार १० ऑक्टोबर ...
अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार १० ऑक्टोबर २०२१ ला राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना ३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरता येणार असल्याचे परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या परित्रकाव्दारे जाहीर केले आहे.
इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीपर्यंतच्या सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम, अनदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शिक्षण पदावरील नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे दोन वर्षापासून परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांची संख्या यंदा वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी लाखोच्या संख्येत उमेदवार या परीक्षेला बसतात. दोन वर्षाच्या अवधीनंतर परीक्षा होत असल्याने यावेळी उमेदवार वाढण्याची शक्यता आहे. परीक्षा परिषदेतर्फे आक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान हॉल तिकीट काढता येणार आहे. तसेच १० ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात व दुपारच्या सत्रात टीईटी परीक्षेचा पहिला व दुसरा पेपर घेतला जाईल.