थॅलेसेमीया ठरतोय जीवघेणा आजार
By Admin | Published: May 8, 2016 12:14 AM2016-05-08T00:14:00+5:302016-05-08T00:14:00+5:30
थॅलेसेमीया हा अनुवांशिक एक आजार आहे. या आजारामध्ये रुग्णांची शरीरात हिमोग्लोबीन चे प्रमाण अस्थिर राहते.
जागतिक थॅलेसेमीया दिन : इर्विनच्या 'डे केअर सेंटर'मध्ये मोफत उपचार
अमरावती : थॅलेसेमीया हा अनुवांशिक एक आजार आहे. या आजारामध्ये रुग्णांची शरीरात हिमोग्लोबीन चे प्रमाण अस्थिर राहते. हिमोग्लोबीनमधील अल्फा आणि बिटा चेनच्या रचनेमध्ये दोष असतो लाल रक्त पेशीचा नाश लवकर होतो. त्यामुळे हिमोग्लोबीन खुब कमी होते. हा त्रास रुग्णांला नेहमी असतो. त्यामुळे वारंवार रक्त संक्रमण करावे लागते. ज्यामुळे रुग्णांचे जीवन हे रक्तावर अवलंबून असते. जर रुग्णांनी नियमीत रक्त संक्रमण घेतले नाही तर त्यांचे जीवन कठीण होते.
थॅलेसेमीयाचे दोन प्रकार
थॅलेसेमीया मायनर : थॅलेसेमीया मायनर आजार असणाऱ्या व्यक्ती या पूर्णपणे निरोगी असतात. त्याच्या दैनंदिन जीवनात कोणतीही अडचण नसते. त्याला कोणत्याही प्रकारचा थकवा जागवत नाही. कुठलाही त्रास होत नाही. परंतू हा आजार असणाऱ्या व्यक्ती थॅलेसिमीया या आजाराने वाहक असतात.
प्रत्येक व्यक्ती स्वत:ला निरोगी समजतो, थॅलेसेमीया आजराची आजाराची माहिती सुध्दा त्याला राहत नाही. व कोणीही थॅलेसेमीया मायनर असण्याची शक्यता असू शकते. दोन थॅलेसेमीया मायनर व्यक्तींचे लग्नामधून होणाऱ्या अपत्यांना थॅलेसेमीया मेजर आजार होण्याची शक्तता असते. त्यामुळे मुलांना वारंवार रक्त संक्रमन करावे लागते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने थॅलेसेमीया आजाराची तपासणी करणे आवश्यक आहे ही तपासणी डे केअर युनिट, हिमॉटोलॉजी विभाग, सामान्य रुग्णांलय अमरावती येथे मोफत केल्या जाते.ज्या रुग्णांना पानथडीचा आकार मोठा झाला असेल अशा रुग्णांची शस्त्रक्रिया करुन वाढलेली पानथडी काढल्या जाते.उपचार करण्यासाठी बोनमॅरो ट्रांसप्लांट ही प्रक्रीया केली जाते. ही प्रक्रिया महाग असल्याने अनेक रुग्ण करु शकत नाही. इर्विन रुग्णालयात मोफत उपचार केला जातो. रक्त संक्रमण मोफत देण्यात येते. त्यामुळे रुग्णांना होणारा त्रास कमी होतो.डे केअर युनिट, हिमॉटोलॉजी विभागांतर्गत याची मोफत तपासणी केली जाते.
संकलन : मनोज सहारे
डे केअर युनिट, हिमॉटोलॉजी विभाग, सामान्य रुग्णालय, अमरावती.
थॅलेसेमीयावर उपचार
थॅलेसेमीया हा अनुवांशिक आजार असून या आजारावर कुठलाही उपचार नाही. पण वारंवार रक्त संक्रमण करावे लागत असल्याने त्यांच्या शरीरात लोहाचे प्रमाण वाढते. शरीरात लोहाचे प्रमाण अधिक न वाढावे यासाठी त्यांना टॅब, डेसीरोक्स, कॅप.केलफर या औषधी देवून त्याच्या शरीरात लोहाचे प्रमाण स्थिर ठेवता येते.
थॅलेसिमीया आजाराची लक्षणे
वयाच्या ६ व्या महिन्यापासून दिसायला सुरुवात होते.त्यात बाळाचे हिमोग्लोेबीन झपाटयाने कमी व्हायला सुरुवात होते. बाळचा रंग पांढरा पडायला सुरुवात होते.
बाळ नियमीत आहार घेत नाही.
चिडचिड व रडत राहतो.
बाळाचे पोट फुगलेले दिसते.
शारीरिक व मानसिक वाढ खुंटते.
प्रतिबंध उपाय
उंच ठिकाणी जाणे टाळणे
नियमीत आहार घेणे
नियमतीत आराम करणे.
पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.
शरीराला अधीक प्रमाणात कुठल्याही प्रकारे थकवा जाणवणार नाही असे काम करु नये.
नियमीत साधारण व्यायाम करणे
नित्यनियमाने एच. बीची तपासणी करत राहाणे.