जिल्हा कचेरीसमोर तळली भजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:02 PM2019-06-28T23:02:24+5:302019-06-28T23:02:49+5:30

केंद्र व राज्य शासनाचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीचे धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग व नोकऱ्यांवर झाला असून, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या अन्यायकारक धोरणाविरोधात शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हा कचेरीसमोर पकोडे तळून सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, रविकांत वर्पे, निखिल ठाकरे, सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात अपर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

Thalli Bhaji in front of District Council | जिल्हा कचेरीसमोर तळली भजी

जिल्हा कचेरीसमोर तळली भजी

googlenewsNext
ठळक मुद्देन्याय द्या : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र व राज्य शासनाचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीचे धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग व नोकऱ्यांवर झाला असून, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या अन्यायकारक धोरणाविरोधात शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हा कचेरीसमोर पकोडे तळून सरकारचा निषेध नोंदविला. यावेळी प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, रविकांत वर्पे, निखिल ठाकरे, सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात अपर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
उच्च शिक्षण घेऊनही लाखो तरुणांना नोकरीसाठी भटकावे लागत आहे. रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. भाजप सरकारच्या काळातच २०१७-१८ मध्ये बेरोजगारी दर ६.१ टक्के झाला आहे. अस्मितेच्या मुद्द्यावर राजकारण करणाºया मोदी सरकारने नोकºया, उद्योगवाढीसाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देणाºया या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मागील पाच वर्षांत देशभरातील दोन कोटी तरुणांनी नोकºया गमावल्या. उच्चशिक्षित बेरोजगार युवकांची वाढती संख्या ही चिंताजनक आहे. बेरोजगारी तब्बल ४५ वर्षांतील सर्वात अधिक आहे. म्हणजे, गेल्या वर्षभरात सर्वाधिक बेरोजगार निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. या सरकारने बेरोजगारांना न्याय देण्यासाठी कुठलेही ठोस पावले उचलले नाही. सरकारच्या बेरोजगारांबाबत निष्क्रिय धोरणांचा तीव्र निषेध करीत बेरोजगारांना तात्काळ रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली.
आंदोलनात प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, रविकांत वर्पे, प्रदेश सरचिटणीस निखिल ठाकरे, धीरज निंभोरकर, गजानन रेवाळकर, आकाश हिवसे, प्रफल्ल ठाकरे, अमित जगताप, ऋग्वेद देशमुख, ऋषीकेश बारब्दे, प्रथमेश ठाकरे, मंगेश ढगे, अक्षय महल्ले, संकेत ठाकरे, विवेक खंडारे, ऋषीकेश चिकटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Web Title: Thalli Bhaji in front of District Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.