कोरोना महामारीचे थैमान; नगर पालिका प्रशासन सुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:12 AM2021-04-19T04:12:04+5:302021-04-19T04:12:04+5:30

शहरातील तुडुंब भरलेल्या नाल्या, वाढलेले गाजरगवत यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात आजारात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

Thaman of the Corona epidemic; Municipal administration sluggish | कोरोना महामारीचे थैमान; नगर पालिका प्रशासन सुस्त

कोरोना महामारीचे थैमान; नगर पालिका प्रशासन सुस्त

Next

शहरातील तुडुंब भरलेल्या नाल्या, वाढलेले गाजरगवत यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात आजारात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच नगर पालिका प्रशासनाने कोविड संदर्भात उपाययोजना करण्यात याव्या. त्याकरिता बाजारपेठेत स्वछता, नाल्या साफसफाई, गावातील प्रत्येक गल्लीत फवारणी करून निर्जंतुकीकरण करणे, भाजीपाला, फळविक्रेत्यांचे दुकान एकमेकांपासून कमीत कमी ५० फूट अंतरावर असणे आवश्यक आहे. यासोबतच नगर परिषद प्राथमिक/ विद्यालयातील शिक्षकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कोरोना महामारीबद्दल जनजागृती अभियान राबवणे व प्रत्येक घरातील वृद्धाची संख्या किती? शुगर, ब्लडप्रेशर, हृदय रुग्णांची नोंदणी करून दक्षता घ्यावी. अशा विविध विषयांवर गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत लवकरात लवकर उपाययोजना व्हावी व शहराला कोरोनामुक्त करावे, अशी मागणी आकाश उटाळे, चेतन राठी, शुभम जमुनापाने यांनी केली आहे.

Web Title: Thaman of the Corona epidemic; Municipal administration sluggish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.