एसआरपीएफ बँडकडून चौकाचौकांत नागरिकांचे आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 11:44 PM2021-03-27T23:44:43+5:302021-03-27T23:45:33+5:30

जिल्हाधिकारी  शैलेश नवाल व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, एसडीओ उदयसिंह राजपूत, तहसीलदार व  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, मंडळ अधिकारी  ढोक  यांची यावेळी उपस्थिती होती. कोरोना प्रादुर्भाव थांबविण्याकरिता वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. याबाबत अनेक नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व जिल्हा प्रशासनाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Thank you citizens from SRPF Band | एसआरपीएफ बँडकडून चौकाचौकांत नागरिकांचे आभार

एसआरपीएफ बँडकडून चौकाचौकांत नागरिकांचे आभार

Next
ठळक मुद्देकोरोनाकाळात नागरिकांचे सहकार्य, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाकाळात सर्वच समाजघटकांच्या सहकार्याची  जाणिव ठेवून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह एसआरपीएफचे बँड पथक शहराच्या चौकाचौकांत देशभक्तीपर धून वाजवून आभार व्यक्त करीत आहेत व याचसोबत कोरोना संसर्गाविषयीची जनजागृती करीत आहे.
जिल्हाधिकारी  शैलेश नवाल व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, एसडीओ उदयसिंह राजपूत, तहसीलदार व  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, मंडळ अधिकारी  ढोक  यांची यावेळी उपस्थिती होती. कोरोना प्रादुर्भाव थांबविण्याकरिता वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. याबाबत अनेक नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व जिल्हा प्रशासनाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. या संकल्पनेला राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ अमरावती या विभागातील बँड पथकाने देशभक्तीपर धून वाजवून स्वागत आणि आभार व्यक्त केले. 
पोलीस निरीक्षक  प्रफुल्ल वाघमारे यांच्या मार्गदर्शनात राज्य राखीव पोलीस बल गट  ९ अमरावती  येथील बँड पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी जिल्हा शोध व बचाव पथकातील कर्मचाऱ्यांसह हेमंत सरकटे, अमित बुले, भूषण वैद्य, उदय मोरे, देवानंद भुजाडे, अर्जुन सुंदरडे, आकाश निमकर, बँड पथकातील कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक एम. बी. नेवारे, ए.के. खडसे, एम.सी. हिवराळे, ए.एस.जाधव, के.एस. घाटोळे, पी.एस. नवाळे, एम.आर. ठाकरे, कौशल मोरघडे यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.

संर्सगाचे काळात अमरावतीकरांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करत शिस्त दाखविली आहे. यासाठी नागरिकांप्रती आभार व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची संकल्पना आहे. संसर्ग नियंत्रणात राहिल्यास आमचेही कर्मचारी सुरक्षित राहतात. 
- हर्ष पोद्दार, कमाडंट, एसआरपीएफ

त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन
कोरोना काळात, मास्क वापरणे, फिजिकल डिस्टंसिंगचा वापर, सॅनिटायझरने हात वारंवार धुणे, पात्र नागरिकांनी कोरोनाची लस घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी नागरिकांमध्ये जागृतीदेखील करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची ही संकल्पना आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी सांगितले.

 

Web Title: Thank you citizens from SRPF Band

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.