एसआरपीएफ बँड पथकाच्या जयघोषात चौकाचौकांत नागरिकांचे आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:13 AM2021-03-28T04:13:09+5:302021-03-28T04:13:09+5:30
अमरावती : कोरोना संसर्गाच्या काळात समाजाच्या सर्वच घटकांचे सहकार्य जिल्हा प्रशासनाला लाभत आहे. या जाणिवेेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्याच्या ...
अमरावती : कोरोना संसर्गाच्या काळात समाजाच्या सर्वच घटकांचे सहकार्य जिल्हा प्रशासनाला लाभत आहे. या जाणिवेेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह एसआरपीएफचे बँड पथक शहराच्या चौकाचौकांत देशभक्तीपर धून वाजवून आभार व्यक्त करीत करीत आहे व याचसोबत कोरोना संसर्गाविषयीची जनजागृती करीत आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, एसडीओ उदयसिंह राजपूत, अमरावती तहसीलदार व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, मंडळ अधिकारी ढोक यांची यावेळी उपस्थिती होती. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने काढलेल्या आदेशाला अमरावतीकरांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. याबाबत अनेक नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व जिल्हा प्रशासनाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. या संकल्पनेला राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ अमरावती या विभागातील बँड पथकाने देशभक्तीपर धून वाजवून स्वागत आणि आभार व्यक्त केले. पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघमारे यांच्या मार्गदर्शनात राज्य राखीव पोलीस बल गट ९ अमरावती येथील बँड पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी जिल्हा शोध व बचाव पथकातील कर्मचाऱ्यांसह हेमंत सरकटे, अमित बुले, भूषण वैद्य, उदय मोरे, देवानंद भुजाडे, अर्जुन सुंदरडे, आकाश निमकर, बँड पथकातील कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक एम. बी. नेवारे, ए.के. खडसे, एम.सी. हिवराळे, ए.एस.जाधव, के.एस, घाटोळे, पी.एस. नवाळे, एम.आर.ठाकरेड, कौशल मोरघडे आदींचे सहकार्य लाभले.
बॉक्स
त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन
कोरोना काळात, मास्क वापरणे, फिजिकल डिस्टंसिंगचा वापर, सॅनिटायझरने हात वारंवार धुणे, पात्र नागरिकांनी कोरोनाची लस घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी नागरिकांमध्ये जागृतीदेखील करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची ही संकल्पना आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी सांगितले.