शिक्षक दिनानिमित्त शिवाजी शाळेत ‘थँक्स ए टीचर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:17 AM2021-09-06T04:17:02+5:302021-09-06T04:17:02+5:30
फोटो - मोर्शी ०५ पी मोर्शी : स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या ...
फोटो - मोर्शी ०५ पी
मोर्शी
: स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ‘थँक्स ए टीचर’ उपक्रम राबविण्यात आला.
प्र-मुख्याध्यापक एस.आर. देशमुख अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक एस.एन. गुर्जर, आर.एम. देशमुख, शिक्षक प्रतिनिधी बी.पी. पावडे, शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी पी.के. धोटे, उद्धव गिद, मनीष केचे, सारंग जाणे, संदीप ठाकरे, राजेश मुंगसे, विशाखा ठाकरे, शीतल टोळे, बोबळे, लांडगे, वंदना खांडे, धनश्री कोंबे, रायकवार उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्या काही आजी व माजी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन शिक्षकांना पुष्पगुच्छ व शुभेच्छा पत्र देऊन त्यांचा सन्मान केला. ‘थँक्स ए टीचर’ उपक्रमांतर्गत आयोजित स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्यावतीने स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. संचालन प्रेमा नवरे, प्रास्ताविक प्रवीणा बोहरोपी, तर आभार प्रदर्शन नलिनी खवले यांनी केले.