आय लव्ह यू म्हणत अल्पवयीन मुलीचे बळजबरीने चुंबन; आरोपीस ३ वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2022 05:47 PM2022-10-19T17:47:39+5:302022-10-19T18:11:06+5:30
न्यायालयाने ठोठावली शिक्षा
अमरावती : आय लव्ह यू म्हणत एका अल्पवयीन मुलीचे चु्ंबन घेणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश क्रमांक ५ पी. एन. राव यांनी बुधवारी हा निर्णय दिला. प्रशांत रमेश रंगारी (२७, कोहळा जटेश्वर, नांदगाव खंडेश्वर) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे.
विधीसुत्रानुसार, १९ जानेवारी २०१७ रोजी एक अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसह दर्शनाकरीता जात असताना आरोपीने तिला अडविले. तिचा विनयभंग केला. घटनेपुर्वीदेखील आरोपीने तिचा पाठलाग केला होता. ही बाब तिने वडिलांना सांगितली. त्यावेळी लोणी पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल केले.
सुनावणीदरम्यान अतिरिक्त सरकारी वकील सुनील घोडेस्वार यांनी महत्वाचे साक्षीदार तपासले. तथा त्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत आरोपी प्रशांत रंगारी याला दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावास, तीन हजार रुपये दंड, एक महिना अतिरिक्त साधा कारावास, पोक्सो अन्वये एक वर्षे सश्रम कारावास, तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार सविता इंगळे व अरूण हटवार यांनी काम पाहिले.