संतोष बांगर यांच्या वाहनावर हल्ला योग्यच, अंबादास दानवेंची शिवसैनिकांच्या पाठीवर थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 10:57 AM2022-10-11T10:57:46+5:302022-10-11T10:59:07+5:30

आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावरील हल्लाबोल प्रकरण घटनेत सहभागी शिवसैनिकांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

The attack on MLA Santosh Bangar's vehicle was right, Ambadas Danve's pat on the back of the Shiv Sainiks | संतोष बांगर यांच्या वाहनावर हल्ला योग्यच, अंबादास दानवेंची शिवसैनिकांच्या पाठीवर थाप

संतोष बांगर यांच्या वाहनावर हल्ला योग्यच, अंबादास दानवेंची शिवसैनिकांच्या पाठीवर थाप

Next

वनोजा बाग / अंजनगाव सुर्जी (अमरावती) : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर अंजनगावात शिवसैनिकांनी केलेला हल्ला योग्यच होता, असे म्हणत शिवसेना नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांच्या पाठीवर थाप दिली.

अंजनगाव सुर्जी येथे देवनाथ मठाच्या दर्शनाहून परतणाऱ्या आ. संतोष बांगर यांचे वाहन अडवून त्यावर शिवसैनिकांनी हल्ला करून ‘कुणी माझ्या गाडीला टच करून दाखवेल तर...’ हे आव्हान पूर्ण केले होते. या घटनेत सहभागी शिवसैनिकांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, अंबादास दानवे हे अमरावती जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्यासह अंजनगावात दाखल झाले. त्यांनी नवीन बस स्टॅण्ड येथे शिवसैनिकांशी संवाद साधला.

तुमची कृती योग्यच होती. त्यामुळे आमदार बांगर यांच्या गाडीवर हल्लाबोल करणाऱ्या शिवसैनिकांच्या धाडसी कृतीचे कौतुक करणे गरजेचे ठरते. शिवसेनेला तुमचा अभिमान आहे, असे कौतुक त्यांनी केले. आ. दानवे यांचे स्वागत तालुकाप्रमुख कपिल देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र आकोटकर, महेंद्र दिपटे, गजानन लवटे आदींनी केले. अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Web Title: The attack on MLA Santosh Bangar's vehicle was right, Ambadas Danve's pat on the back of the Shiv Sainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.