Video : आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका; कृषी महोत्सवातील राणा दाम्पत्याचे बॅनर हटवले
By प्रदीप भाकरे | Published: January 13, 2023 12:50 PM2023-01-13T12:50:00+5:302023-01-13T12:53:43+5:30
अमरावती पोलिसांची कारवाई
अमरावती : खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांचे पोस्टर्स व बॅनर्स शुक्रवारी तातडीने काढण्यात आले. येथील सायन्सकोर मैदानात युवा स्वाभिमान पक्षाचा कृषी महोत्सव होत असून, त्या महोत्सवस्थळी खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांची छायाचित्रे असलेले मोठे बॅनर्स प्रवेशद्वारावर लावण्यात आले होते. आचारसंहितेचा भंग केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास ते बॅनर्स हटविण्यात सुरूवात झाली. राणा दाम्पत्यावर आचारसंहिता भंग करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
राणा दाम्पत्याचे बॅनर हटवले; आचारसंहितेचा भंग #RaviRana#NavneetRanahttps://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/cO22y2vLwy
— Lokmat (@lokmat) January 13, 2023
सध्या विभागात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असून, त्यादरम्यान १२ जानेवारीपासून सुरू झालेल्या युवा स्वाभिमान महोत्सवाच्या अग्रभागावर राणा दाम्पत्याचे मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले. हे मैदान जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असल्याने त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. सोबतच, शहर कोतवाली पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले. सुमारे दोन तास ते बॅनर्स हटविण्याची कारवाई सुरू होती.