विधानसभा निवडणुकीच्या काळात येणाऱ्या अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा समोर ढकलल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 04:33 PM2024-10-23T16:33:12+5:302024-10-23T16:34:21+5:30
Amravati : आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात घेण्यात येणाऱ्या विद्यापीठाच्या परिक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला यश
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या नियमित विषम सत्राच्या हिवाळी २०२४-परिक्षा ह्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान म्हणजेच ११ नोव्हेंबर २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२४ होत होत्या आणि त्याच दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार परीक्षा समोर ढकलण्याचे निवेदन विद्यापीठाने मान्य केले.
परिक्षेच्या काळात प्रचार रॅली, प्रचार सभा, भोंग्याच्या आवाज या सर्व गोष्टींचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला असता, या सर्व गोंधळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता होती. त्याचप्रमाणे एल एल बी दुसऱ्या सत्राचा निकाल उशिरा लागल्याने नियमित विद्यार्थ्यांचे व कॅरी ऑन विद्यार्थ्यांचे प्रवेश उशिरा झाले आणि त्यात अभ्यासक्रमात बदल झाल्याचे परिपत्रक जाहीर केले तोपर्यंत विद्यार्थ्यांनी कोणता अभ्यास करायचा हे विद्यापीठाने अधिकृतरीत्या जाहीर केले नव्हते त्यामुळे त्या परिपत्रकापासुन शासकीय सुट्या वगळता फक्त ३३ दिवसाचा कालावधी विद्यार्थ्यांना मिळत आहे जो की खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत लक्षात घेऊन विद्यापीठाचे कुलगुरू तसेच डॉ. नितीन कोळी,संचालक परिक्षा विभाग यांनी विद्यार्थ्यांच्या निवेदनाची दखल घेत डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच २७ डिसेंबर २०२४ ते ६ जानेवारी २०२५ दरम्यान परिक्षा घेण्याची मागणी मान्य केली व तसा सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांना पाठवण्यात आला, त्यामुळे विधी शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांना(तिसरे सत्र, पाचवे सत्र, सातवे सत्र) यांना दिलासा मिळाला आणि परिक्षेची तयारी करण्यासाठी योग्य प्रमाणात वेळ मिळाला.
याबद्दल सर्व विद्यार्थ्यांकडून श्री नथमल गोयनका विधी महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थी प्रतिनिधी नितीन जामनिक यांचे आभार मानले तर निवेदनाद्वारे केलेली मागणी मान्य झाल्याबद्दल नितीन जामनिक यांनी मा. कुलगुरू व परिक्षा विभागाचे संचालक मा.डॉ. नितीन कोळी सर यांचे आभार मानले.