पालकांच्या साक्षीनेच होईल लग्न; उपस्थिती अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 01:22 PM2024-05-04T13:22:42+5:302024-05-04T13:24:39+5:30

Amravati : पथ्रोट येथील आर्य समाज मंदिराचा आगळावेगळा ठराव

The marriage will take place only with the witness of the parents; Attendance is mandatory | पालकांच्या साक्षीनेच होईल लग्न; उपस्थिती अनिवार्य

Aarya Samaj Marriage will take place only in presence of parents

लोकमत न्यूज नेटवर्क 
पथ्रोट :
स्थानिक आर्य समाज मंदिरामध्ये विवाह नोंदणी संस्था असल्यामुळे अनेक तरुणांचे लग्नच नव्हे, प्रेमविवाह येथून होत असतात. यापुढे येथे आई वडिलांच्या उपस्थितीत लग्न होतील, असा ठराव कार्यकारिणीत घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. पथ्रोट येथे १६ जुलै १९३५ रोजी आर्य समाज मंदिराची स्थापना ठाकरे गुरुजी यांच्या नेतृत्वात झाली होती. तत्कालीन सरकारने हिंदू मॅरेज अॅक्ट १९३५ मधील तरतुदीनुसार आर्य समाज मंदिराला विवाह विधी आर्य समाज मॅरेज व्हॅलिडेशन १९३७ यासह लावण्याचे अधिकार दिले.


त्यामुळे या प्रेमसंबंधातून वडिलांच्या नोंदणी संस्थेत लग्न, आई- विरोधात जाऊन लग्नकार्य मोठ्या होती. त्यामुळे संख्येने होत अनेक समस्यांना आर्य समाज मंदिर पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत मागील काही असे. याशिवाय वर्षांपासून आर्य समाज मंदिर कार्यकारिणीमध्ये अंतर्गत वाद होत आहेत. काही प्रकरणे पोलिस ठाण्यापर्यंत गेल्याने मोठे वादळ उठले. त्यामुळे नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. दरम्यान, आर्य समाज विवाह नोंदणी संस्थेला प्रेमविवाह झाल्यानंतर कुटुंबीयांच्या विरोधाचा सामना, त्यातून निर्माण होणारे वाद, कायदेशीर प्रक्रिया या सर्व बाबींमध्ये होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी कार्यकारिणीने आता यापुढे प्रेमीयुगुलाच्या आई-वडिलांच्या संमतीनेच कुठलाही विवाह नोंदणी संस्थेत होणार असल्याचा ठराव घेतला. या ठरावानुसार, वर-वधू पक्षाच्या पालकांनी पाच दिवस अगोदर हजर राहून संमती घेणे अनिवार्य केले आहे.


प्रेमविवाह किवा पळून येऊन लग्न लावणाऱ्या तरुण-तरुणींच्या कुटुंबांमध्ये वाद निर्माण होऊन त्याचे पडसाद संस्थेवरही उमटतात. म्हणून अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.

- रामेश्वर काकड , प्रधान, आर्य समाज मंदिर, पथ्रोट
 

Web Title: The marriage will take place only with the witness of the parents; Attendance is mandatory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.