मंत्रालयास घेरावासाठी निघालेल्या प्रकल्पग्रस्तांना अमरावतीत रोखले

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: January 8, 2024 10:07 PM2024-01-08T22:07:27+5:302024-01-08T22:08:10+5:30

आधी मंत्रालयातील तिसऱ्या माळ्यावरून जाळीवर उड्या : ३०० प्रकल्पग्रस्तांचा रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

The project victims who were going to besiege the ministry were stopped in Amravati | मंत्रालयास घेरावासाठी निघालेल्या प्रकल्पग्रस्तांना अमरावतीत रोखले

मंत्रालयास घेरावासाठी निघालेल्या प्रकल्पग्रस्तांना अमरावतीत रोखले

अमरावती : प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयास घेराव करण्यास मोर्शीवरुन निघालेल्या ३०० वर प्रकल्पग्रस्तांना सोमवारी सायंकाळी पोलिसांनी रोखले. त्यामुळे त्यांनी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात शिदोऱ्या काढून ठिय्या दिला. अचानक झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ उडाली. 

येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. दरम्यान आम्ही कोणत्याही मार्गाने मुंबई गाठू, असा निर्घार याप्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला.विविध मागण्यांसाठी अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त कृती समितीचे मोर्शी तहसील कार्यालयासमोर १९ मे २०२३ पासून आत्मक्लेश आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला २४५ दिवस झालेले आहे. 

त्यापूर्वी शासनाचा लक्षवेध करण्यासाठी २५ ऑगस्ट २०२३ रोजी १० ते १२ प्रकल्पग्रस्तांनी मुंबई मंत्रालयातील तिसऱ्या माळ्यावरुन सुरक्षा जाळीवर उडी घेत घोषणा दिल्या व राज्याचे लक्ष वेधले होते.

Web Title: The project victims who were going to besiege the ministry were stopped in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.