कोलकाता, बदलापूर घटनेतील नराधमांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला

By गणेश वासनिक | Published: August 24, 2024 04:35 PM2024-08-24T16:35:44+5:302024-08-24T16:36:42+5:30

Amravati : भीम ब्रिगेडचे आंदोलन, सरकारने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी

The symbolic effigy of the killers of Kolkata and Badlapur, incident was burnt | कोलकाता, बदलापूर घटनेतील नराधमांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला

The symbolic effigy of the killers of Kolkata and Badlapur, incident was burnt

गणेश वासनिक / अमरावती 

अमरावती: कोलकाता, बदलापूर व अकोला येथे चिमुकल्या लेकींवर अत्याचाराच्या घटना घडल्या असून, यांतील नराधमांना फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे, यासाठी भीम ब्रिगेडच्या वतीने बडनेरा येथे शनिवारी नराधमांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

बडनेरा येथील समता चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायथ्याशी आरोपीचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला. यावेळी भीम ब्रिगेडचे पदाधिकारी, शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भीम ब्रिगेडचे संस्थापक राजेश वानखडे, विक्रम तसरे, नितीन काळे, अंकुश आठवले, गौतम सवाई, अविनाश जाधव, मनोज चक्रे, प्रवीण मोहोड, उमेश कांबळे, साहिल आंधळे, रोषण गवई, प्रफुल्ल लोखंडे, केवल हिवराळे, अक्षय शिनकर, विजू मोहोड, विजू खंडारे, सतीश दुर्योधन, अक्षय बोके, सोहेल खान, प्रतीक पाटील, नयन सवाई, नयन तसरे, निहार डोंगरे, हर्ष बागडे, अनिकेत रामटेके, सर्वेश महाजन, कल्पेश मेश्राम, प्रतीक नागदिवे, शैलेश गोंडाणे, सुदर्शन बडगे, हिमेश डोंगरे, मंथन मेश्राम, सूरज गरुड, विशाल गरुड, आदेश पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: The symbolic effigy of the killers of Kolkata and Badlapur, incident was burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.