चोरी प्रकरण : तिघांना आठ तासांत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 05:00 AM2021-03-14T05:00:00+5:302021-03-14T05:01:02+5:30
सुंदरनगर चांदूरवाडी येथील फिर्यादी राजूसिंग सरदारसिंग चितोडिया (४७) याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने १० ग्राम सोने चांदीचे दोन कडे, अडीचशे ग्रॅम वजनाचा गळ्यातील चांदीचा हार, साडेसातशे ग्रॅम डोक्यातील केसाला लावण्याचे चांदीचे फूल, १०० ग्रॅम चांदीचे दोन बटन, ५०० ग्रॅम कोरा असा दोन किलो १०० ग्रॅम चांदी ८८ हजार रुपयांचा व पूजेच्या काशी धातूचा गडवा एक लहान सायकल असा एक लाख ३० हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती / चांदूर रेल्वे : नजीकच्या चांदूरवाडी येथील सुंदरनगरातील जडीबुटी यांच्या घरी चोरी झाल्याची बाब शेजारच्या दूधवाल्यांनी लक्षात आणून देताच चांदूर रेल्वे पोलीस व अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाने चोरांचा शोध घेऊन अवघ्या आठ तासांत तिघांना अटक केली.
सुंदरनगर चांदूरवाडी येथील फिर्यादी राजूसिंग सरदारसिंग चितोडिया (४७) याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने १० ग्राम सोने चांदीचे दोन कडे, अडीचशे ग्रॅम वजनाचा गळ्यातील चांदीचा हार, साडेसातशे ग्रॅम डोक्यातील केसाला लावण्याचे चांदीचे फूल, १०० ग्रॅम चांदीचे दोन बटन, ५०० ग्रॅम कोरा असा दोन किलो १०० ग्रॅम चांदी ८८ हजार रुपयांचा व पूजेच्या काशी धातूचा गडवा एक लहान सायकल असा एक लाख ३० हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला. आरोपी उमेश उत्तमराव गलबले (३२), मोहन बबनराव नागोसे (२९) व विजय शामराव भोयर (२३, सर्व रा. चांदुरवाडी) यांना अटक केली. चांदूर रेल्वेचे ठाणेदार मगन मेहते व अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कर्मचारी यांना गुन्हा दाखल करून केला व माहिती मिळताच एसडीपीओ संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात श्वानपथकाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. हे सर्व आरोपी चांदूरवाडी येथील असल्याचे गुन्हे अन्वेषण विभाग व चांदूर रेल्वे पोलिसांनी निष्पन्न केले. शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांचा पीसीआर मिळाला.