बडनेरा रेल्वे स्थानकातून कागदपत्रांची चोरी

By admin | Published: August 29, 2015 12:39 AM2015-08-29T00:39:30+5:302015-08-29T00:39:30+5:30

बडनेरा रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तिकीट बुकींग जवळूून गुरुवारी रात्री दीड वाजताच्या ...

Theft of documents from Badnera railway station | बडनेरा रेल्वे स्थानकातून कागदपत्रांची चोरी

बडनेरा रेल्वे स्थानकातून कागदपत्रांची चोरी

Next

तासाप्रमाणे चोरट्यांचे ठरले दर : बाहेरगावच्या प्रवाशांची फसवणूक
अमरावती : बडनेरा रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तिकीट बुकींग जवळूून गुरुवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास एका महिलेचे ८० हजार रुपयांसह आवश्यक कागदपत्र चोरीस गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात चोरट्यांचा आश्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी रोशन लवराज कोंडावार (२८. रा.शंकरनगर अमरावती) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे.
बडनेरा रेल्वे पोलिसात रोशन कोंडावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माझी आई नावे प्रमोदिनी लवराज कोंडावार (६६) आणि मी आंध्र प्रदेशातील करीमनगर जिल्ह्यातील वेगुलवाडा येथून देव दर्शन करुन बडनेरा रेल्वे स्थानकावर वर्धा- भुसावळ पँसेजरने २७ आॅगस्ट रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास परतलो. अमरावतीच्या शंकरनगर येथे जाण्याकरिता आॅटोरिक्षा शोधला असता चालकांनी जास्त दर सांगितले. रात्री दीड वाजले असल्यामुळे इतक्या रात्री घरी जाण्यापेक्षा वर्दळीचे स्थळ असलेल्या तिकीट बुकींग परिसरात दिवस उजाडण्याची प्रतीक्षा करीत बसलो. मात्र प्रवासाचा थकवा असल्यामुळे केव्हा झोप लागली हे कळलेच नाही.
परंतु सकाळी झोप उघडली तेव्हा सोबत असलेली काळ्या रंगाची महिला पर्स गायब झाल्याचे लक्षात आहे. बराच शोध घेतला असता ती मिळाली नाही. अखेर ही बॅग कोणीतरी चोरुन नेल्याचा संशय आला. त्यामुळे रेल्वे पोलीस ठाणे गाठून झालेली हकिकत तक्रारीद्वारे नोंदविली.
या बॅगमध्ये रोख ८० हजार रुपयांसह मोबाईल, घर व आलामारीच्या चाव्या, पॅनकार्ड, चंद्रपूर व अमरावती येथील बँकेचे पासबूक, बीपीएलचे कार्ड, शिधापत्रिका, एटीएम कार्ड, अपंग प्रमापपत्र, सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आदी साहित्य होते. याप्रकरणी पोलिसांनी बॅग हरविल्याचा अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु २४ तास पोलिसांची वर्दळ असलेल्या परिसरात चोरी होते कशी, हा संशोधनाचा विषय आहे. रेल्वे स्थानक परिसरात काही महिन्यांपासून चोरीच्या घटना घडत असताना याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Theft of documents from Badnera railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.