हातुर्णा, गाडेगाव येथे भरवस्तीत चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:15 AM2021-09-23T04:15:04+5:302021-09-23T04:15:04+5:30
फोटो - राजुरा बाजार २२ पी राजुरा बाजार : नजीकच्या बेनोडा (शहीद) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातुर्णा व गाडेगाव येथील ...
फोटो - राजुरा बाजार २२ पी
राजुरा बाजार : नजीकच्या बेनोडा (शहीद) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातुर्णा व गाडेगाव येथील मध्यवस्तीत एकाच रात्री दोन दुकाने व घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली. लाखोंचा ऐवज व मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
सुरेश बोंद्रे यांच्या किराणा दुकानाचे रात्रीच्या अंधारात शटर वाकवून ४० हजार रुपये रोख व १५ हजारांचे किराणा साहित्य लंपास करण्यात आले. नंतर अंकुश कुकडे यांचे कृषिसेवा केंद्राचे शटर वाकविण्याचा प्रयत्न केला. शटर मजबूत असल्याने चोरटे अयशस्वी झाले. चोरट्यांनी यानंतर मोर्चा पुंडलिक गावंडे यांच्या घराकडे वळविला. घरी कुणी नसल्याचा फायदा घेत अलमारी फोडून १५ ग्रॅम सोन्याची पोत व १५ हजार रुपये लंपास करण्यात आली
नजीकच्या गाडेगाव येथेही राजेंद्र टेकाडे यांच्या घरी चोरट्यांनी घर फोडून २० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रिंग, डोरले व २० हजार रुपये रोख असा ऐवज रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत लाखोंचा ऐवज लंपास केला. नंतर येथीलच नव्यानेच सुरू झालेले यशवंत ॲग्रोटेक या कृषिसेवा केंद्राचे शटर वाकवून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. ही दुकाने व घरे मध्यवस्तीत असूनही चोरी झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. पुढील तपास बेनोडा (शहीद) चे ठाणेदार मिलिंद सरकटे, बीट जमादार सुभाष शिरभाते करीत आहेत.
220921\img-20210921-wa0027.jpg
हातुरणा,गाडेगाव चोरी