कोविड सेंटरमध्ये दाखल महिलेच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:31+5:302021-06-16T04:17:31+5:30

चांदूर रेल्वे : कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या महिलेच्या चांदूरवाडी येथील घरी चोरी करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सदर कामगिरी ठाणेदार ...

Theft at the home of a woman admitted to the Covid Center | कोविड सेंटरमध्ये दाखल महिलेच्या घरी चोरी

कोविड सेंटरमध्ये दाखल महिलेच्या घरी चोरी

Next

चांदूर रेल्वे : कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या महिलेच्या चांदूरवाडी येथील घरी चोरी करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सदर कामगिरी ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील व चांदूर रेल्वे पोलिसांनी केली.

चांदूरवाडी येथील फिर्यादी ६५ वर्षीय सेवानिवृत्त वनमजूर महिलेने पेन्शनचे एक लाख रुपये शौचालयाच्या कामासाठी घरी जमा करून ठेवले होते. सदर महिला कोरोनाग्रस्त झाल्याने कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल होती. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपी गब्बर उर्फ मंगेश सलामे (४०, रा. चांदूरवाडी) याने सदर महिलेच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून एक लाखाची रक्कम लंपास केली होती. महिला बरी होऊन घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले व तिने याबाबत चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीच्या शोधात पथके रवाना केली होती. यानंतर सदर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. अटक केलेला आरोपी गब्बर उर्फ मंगेश सलामे याला रविवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील, कॉन्स्टेबल शुद्धोधन उमाळे करीत आहेत.

===Photopath===

140621\img-20210614-wa0022.jpg

===Caption===

photo

Web Title: Theft at the home of a woman admitted to the Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.