बेनोडा शेतशिवारातून संत्र्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:12 AM2021-02-07T04:12:32+5:302021-02-07T04:12:32+5:30
बेनोडा शहीद : बेनोडा शेत शिवारातून मनीष गोहाड यांच्या शेतातून चोरांनी मृग बहाराचा तोडणीस आलेला अंदाजे ७० क्रेट संत्रा ...
बेनोडा शहीद : बेनोडा शेत शिवारातून मनीष गोहाड यांच्या शेतातून चोरांनी मृग बहाराचा तोडणीस आलेला अंदाजे ७० क्रेट संत्रा लंपास केल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी सकाळी उघड झाली. मनीष गोहाड यांच्या अमरावती पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या बागातील मृग बहाराचा संत्रा त्यांनी अब्दुल कलाम नामक व्यापाऱ्याला १८ लाख रुपयात विकला असून व्यापाऱ्याने तेथे एक सोकारीसुद्धा बसविला आहे.
रात्रीच्या वेळी सोकारी गाढ झोपेत असताना चोराने एका मालवाहू वाहनातून संत्री चोरून नेल्याचे टायरच्या निशानावरून ओळखायला आले. पाच सहा वर्षांपासून संत्रा उत्पादकांना दरवर्षी संकटांची मालिका छळते आहे. सततच्या अस्मानी सुलतानी संकटांचा सामना करता करता जेरीस आलेल्या बळीराजाची या चोरीच्या घटनांनी झोप उडवली आहे. आधीच अत्यल्प उत्पादन त्यात या चोरी म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार एस.सी.भोसले आणि सुदाम साबळे करीत आहे.
--------------