एसआरपीएफ कॅम्पमधील चंदनाच्या झाडांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:11 AM2021-07-01T04:11:20+5:302021-07-01T04:11:20+5:30
----------------------------------------- अमदापुरातून बैलजोडी लंपास अमरावती: नांदगाव पेठ हद्दीतील अमदापुरातून एका शेतकऱ्याची बैलजोडी चोराने लंपास केली. ही घटना मंगळवारी उघडकीस ...
-----------------------------------------
अमदापुरातून बैलजोडी लंपास
अमरावती: नांदगाव पेठ हद्दीतील अमदापुरातून एका शेतकऱ्याची बैलजोडी चोराने लंपास केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. दिनेश रामकृष्ण चौधरी (४३ रा. माळीपुरा, नांदगाव पेठ) यांनी शेतातील खोलीच्या बाजूला बैलजोडी बांधली होती. चौकीदार राजेश बनके यांनी बैलजोडी लंपास झाल्याची माहिती दिली. नांदगाव पेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------------------------------------
गॅस सिलिंडरचा धोकादायक वापर प्रकरणी गुन्हा
अमरावती : सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडरचा धोकादायक वापर केल्याने गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी दोन हातगाडीचालकांविरुद्ध गुन्हा नोंदविला. गाडगेनगर पोलिस पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना सिद्धार्थनगरात शुभम दिलीप महेंद्रकर (२३, रा. अर्जुननगर) व शेख सादिक शेख रशीद (२१, रा. चिलमछावणी) हे दोघेही गॅस सिलिंडरचा धोकादायक वापर करून खाद्यपदार्थ बनवित असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम २८५ अन्वये गुन्हा नोंदविला.