- तर भाजप जेलभरो आंदाेलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 05:00 AM2021-11-22T05:00:00+5:302021-11-22T05:00:57+5:30

राज्य सरकार १३ नोव्हेंबरच्या घटनेला जास्त फोकस करीत आहे. मात्र, १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांनी शहरात जी ‘ॲक्शन’ केली, त्याची १३ नोव्हेंबर रोजी ‘रिॲक्शन’ होती. भाजपने बंदचे आवाहन केले होते, हे आम्ही कबूल करीत आहे.  कारण हिंदू असुरक्षित असेल तर भाजप त्यांच्या सुरक्षेसाठी कधीही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. हिंदूत्ववादी संघटनांना दोषी ठरविले जात आहे. बळजबरीने अटकसत्र सुरू आहे. मात्र, हीच तत्परता दोषी अल्पसंख्याकांच्या अटकेसाठी दाखविली जात नाही, असा आरोप त्यांनी केला.

- Then BJP will agitate all over the jail | - तर भाजप जेलभरो आंदाेलन करणार

- तर भाजप जेलभरो आंदाेलन करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात १२ व १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या दोन गटातील हिंसाचाराला केवळ भाजप व  हिंदू संघटनांना टार्गेट केले जात आहे. राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या इशाऱ्यावर पोलीस प्रशासन भाजपचे नेते, कार्यकर्त्यांवर एकाच घटनेसाठी चार ते पाच ठाण्यात गुन्हे दाखल करीत आहेत. काही जणांना बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार थांबला नाही तर, भाजप जेलभरो आंदोलन करणार, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला. 
भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दंगलपीडितांची भेट घेतली. संवेदनशील भागात दौरा केला. त्यानंतर  त्यांनी पत्रपरिषदेला संबोधित केले.
राज्य सरकार १३ नोव्हेंबरच्या घटनेला जास्त फोकस करीत आहे. मात्र, १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांनी शहरात जी ‘ॲक्शन’ केली, त्याची १३ नोव्हेंबर रोजी ‘रिॲक्शन’ होती. भाजपने बंदचे आवाहन केले होते, हे आम्ही कबूल करीत आहे.  कारण हिंदू असुरक्षित असेल तर भाजप त्यांच्या सुरक्षेसाठी कधीही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. हिंदूत्ववादी संघटनांना दोषी ठरविले जात आहे. बळजबरीने अटकसत्र सुरू आहे. मात्र, हीच तत्परता दोषी अल्पसंख्याकांच्या अटकेसाठी दाखविली जात नाही, असा आरोप त्यांनी केला. भाजपवर दडपशाही, एकतर्फी कारवाया थांबविल्या नाहीत, तर भाजप जेलभरो आंदोलन करून राज्य सरकारचे जेलमध्ये पाठविण्याचे मनसुबे आम्ही स्वत: पूर्ण करू, असा टोलादेखील त्यांनी लगावला. 
पत्रपरिषदेला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे, महापालिका गटनेता तुषार भारतीय, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, उपमहापौर कुसूम साहू शहराध्यक्ष किरण पातुरकर, रविराज देशमुख, जयंत डेहनकर, ॲड.  प्रशांत देशपांडे, प्रवीण वैश्य, सुनील साहू आदी उपस्थित होते. 

गृहमंत्र्यांना भेटून वास्तव कळवू
१२ व १३ नोव्हेंबर रोजीच्या घटनेचे समर्थन करू शकत नाही. मात्र, १२ तारखेची घटना ‘डिलिट’ करता येत नाही. पोलीस प्रशासन हे कुणाच्या इशाराऱ्यावर कारवाई करीत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मसानगंज भागात दौरा केला असता, एक महिला भेटली आणि त्यांनी मोटरसायकल घरात लावत असताना त्यांच्या मुलाला पोलीस घेऊन गेले. एवढेच नव्हे तर भादंविच्या ३०७ कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. भाजप व अन्य हिंदू संघटनांशी संबंधित असलेल्यांना त्रास दिला जात आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असून, अमरावती येथील वस्तुस्थिती कळविणार असल्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सांगितले.

पालकमंत्री १२ नोव्हेंबरच्या घटनेवर का बोलत नाही?
अमरावती शहरात विनापरवानगी १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांच्या माेर्चाला परवानगी होती का?, राज्यात एकाच वेळी मालेगाव, नांदेड  व अमरावती शहरात मोर्चा काढण्यात आला. हे पूर्वनियोजित षडयंत्र होते का?, यामाध्यमातून राज्य किंवा देशात दंगे भडकविण्याचे कटकारस्थान होते का? याबाबत पालकमंत्री यशोमती ठाकूर काहीही बोलत नाही, असा सवाल विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

 

Web Title: - Then BJP will agitate all over the jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.