तत्कालीन उपवनसंरक्षक होते रेड्डीपासून त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:13 AM2021-04-21T04:13:23+5:302021-04-21T04:13:23+5:30

फोटो पी २० हरिसाल फोल्डर परतवाडा : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात निलंबित श्रीनिवास रेड्डी व विनोद शिवकुमार या दोन्ही ...

The then forest ranger was suffering from Reddy! | तत्कालीन उपवनसंरक्षक होते रेड्डीपासून त्रस्त!

तत्कालीन उपवनसंरक्षक होते रेड्डीपासून त्रस्त!

Next

फोटो पी २० हरिसाल फोल्डर

परतवाडा : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात निलंबित श्रीनिवास रेड्डी व विनोद शिवकुमार या दोन्ही अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानावर अद्यापही त्यांच्याच नावाच्या पाट्या लागल्या आहेत. श्रीनिवास रेड्डी यांच्या कार्यशैलीने तत्कालीन उपवनसंरक्षकसुद्धा त्रस्त होते. अगदी चार्जशीट दाखल करेपर्यंत अनेक प्रकरणे पुढे गेली असल्याची बाब समोर आली आहे.

हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या विनोद शिवकुमार हा चिखलदरा येथील गुगामल वन्यजीव विभागाचा उपवनसंरक्षक असल्याने त्याने आपल्या कार्यकाळात केलेल्या अत्याचार व कृत्याचे पाढे रोजंदारी मजूर ते अधिकारी बोलू लागले आहेत. नुकत्याच येऊन गेलेल्या तपासणी समितीसमोर तर अनेकांनी गंभीर आरोप वजा सत्य स्थिती मांडली. या अधिकाऱ्यांचा मेळघाटातील कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव आणि दबदबा होता. त्यामुळे उपवनसंरक्षकासारखे वरिष्ठ अधिकारी व हाताखालील कर्मचारीही श्रीनिवास रेड्डींपुढे बोलण्याची हिंमत करीत नव्हते. कारण तत्कालीन काही उपवनसंरक्षकांसोबत रेड्डींचा व्यवहार सूड भावनेचा व हुकूमशाही पद्धतीचा असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले.

बॉक्स

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या कार्यशैलीची चर्चा आता रंगू लागले असताना आयएफएस दर्जाचे तत्कालीन उपवनसंरक्षकसुद्धा त्रस्त असल्याची बाब पुढे आली आहे. तत्कालीन उपवनसंरक्षकांच्या पत्नीचा गर्भपात झाल्याने ते आजारी पत्नीच्या उपचारार्थ नियमानुसार अर्ज देऊन सुटीवर गेले होते. सुटी मंजूर न करता रेड्डी यांनी त्या कर्तव्यदक्ष समजल्या जाणाऱ्या उपवनसंरक्षकाची वरिष्ठ कार्यालयास थेट चार्जशीट (दोषारोपपत्र) पाठविली. हे आयएफएस अधिकाऱ्यांची प्रकरण वरिष्ठ स्तरावर चांगलेच रंगले होते.

कार्यालयातील पाट्या हटविल्या

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात निलंबित श्रीनिवास रेड्डी यांच्या शासकीय निवासस्थानावर त्यांच्याच नावाची पाटी आजही लागली आहे. दुसरीकडे गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या निवासस्थानावर पाटी असून, दोघांच्या कार्यालयात असलेल्या केबिनच्या पाट्या मात्र काढण्यात आल्या आहेत.

बॉक्स

हत्ती गेला, शेपूट लवकर पाठवा

दीपाली चव्हाण प्रकरणाने वनविभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. तत्कालीन वनमंत्र्यांनीसुद्धा श्रीनिवास रेड्डीसारख्या अधिकाऱ्यांवर चांगलीच मेहरबानी दाखविली, अशी चर्चा आहे. हत्ती गेला आहे, त्याचे शेपूटही लवकर घरी पाठवा, अशी बोलकी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

Web Title: The then forest ranger was suffering from Reddy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.